Friday, 28 May 2021

सूर्यमाला आकाश गंगा

 आकाश गंगा माहिती 
*



*********************



*_🌍☀️सूर्यमाला☀️🌍_*

*🔸 तारे व ग्रह :-*
*बहुतेक चांदण्या लुकलूकताना दिसतात म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो, अश्या चांदण्याना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशी असतात. सूर्य हा तेजस्वी तारा असून सुर्यमालेचा प्रमुख आहे.*

*🔸 ग्रह :-*
*काही खगोल लुकलूकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते. यांना ग्रह (plannet) असे म्हणतात. पृथ्वी हा एक ग्रह असून सर्व ग्रह परप्रकाशीत असतात.*

*🔸खगोल :-*
*तारे व ग्रह सर्वसाधारणपणे गोलच असतात. ख-म्हणजे आकाश. म्हणून आकाशातले गोल म्हणजे खगोल होत.*

*🔸उपग्रह :-*
*काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. आशा ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलांना त्या ग्रहांचे ' उपग्रह' असे म्हणतात. उदा. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो म्हणून तो पृथ्वीचा उपग्रह मानला जातो.*

*🔸 लघुग्रह :-*
*सुर्यमालेमध्ये मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हणतात.*

*🔸 बटूग्रह :-*
*नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराचे खगोल आहेत त्यांना "बटूग्रह" असे म्हणतात. प्लुटोसारख्या ग्रहांचा यामध्ये समावेश होतो.*

*🔸धूमकेतू :-*
*धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात.*
*सूर्याच्या उष्णतेमुळे यामधील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते,हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात त्यांमुळे धूमकेतू लांबट पिसाऱ्या सारखे दिसतात. यांच्यात दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचितच आकाशात दिसतात.*

*🔸उल्का :-*
*आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडतांना दिसतो. या घटनेला "उल्कापात" म्हणतात.*
*अनेक वेळ उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना "उल्का" असे म्हणतात.*

*🔸 अशनी :-*
*काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांनाच "अशनी" असे म्हणतात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर असाच अशनी अपघाताने तयार झालेलं आहेत.*

*🔸सूर्य हा आपला मुख्य तारा असून सूर्याभोवती 8 ग्रह फिरतात.*

*⭕नोट :- वरील माहिती शक्य तितकी अद्ययावत व अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही नजरचुकीने काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्यावे..🙏🏻*

*⭕लेखन व संकलन :- वृषभ मो.दातखोरे (9764-76-26-96)*

*#MPSC_UPSC_Katta Team*
*_कृपया लेख कॉपी पेस्ट करतांना नावासाहित करावा..._*
**************************+++++++++
भाग 2
*_🌘💫🪐 ग्रहांची माहिती 🪐💫🌒_*

*🔸बुध :-*
              *उपग्रह - ०*
            *आंसांचे कलणे - २.०*
             *परिवलन काल - ५८.६५ (दिवस)*
             *परिभ्रमण काल - ०.२४ वर्ष*

*🔸 शुक्र :-*
            *उपग्रह - ०*
            *आंसांचे कलणे - १७७.२*
            *परिवलन काल - २४३ दिवस* 
            *परिभ्रमण काल - ०.६१ वर्ष*

*🔸पृथ्वी :-*
             *उपग्रह - १*
            *आंसांचे कलणे - २३.५*
          *परिवलन काल - २४ तास*
           *परिभ्रमण काल - १ वर्ष (३६५ दिवस)*

*🔸मंगळ :-*
                *उपग्रह - २*
               *आंसांचे कलने - २५.२*
               *परिवलन काल - २४.६ तास*
               *परिभ्रमण काल - १.८८ वर्ष*

*🔸गुरू :-*
                 *उपग्रह - ६३*
                *आंसांचे कलणे - ३.१*
                *परिवलन काल - ९.९ तास*
               *परिभ्रमण काल - ११.८६ वर्ष*

*🔸 शनी :-*
                     *उपग्रह - ५२*
                    *आंसांचे कलणे - २६.७*
                    *परिवलन काल - १०.६ तास*
               *परिभ्रमण काल - २९.४६ वर्ष*

*🔸युरेनस :-*
               *उपग्रह - २७* 
             *आंसांचे कलणे - ९७.९*
              *परिवलन काल - १६ तास*
              *परिभ्रमण काल - ८४ वर्ष*

*🔸नेपच्यून :-*
                  *उपग्रह :- १३*
               *आंसांचे कलणे - २८.८*
                *परिवलन काल - १८ तास*
                *परिभ्रमण काल - १६४ वर्ष*


*⭕नोट :- वरील माहिती शक्य तितकी अद्ययावत व अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही नजरचुकीने काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्यावे...🙏🏻*

*⭕लेखन व संकलन  :- वृषभ मो.दातखोरे (9764-76-26-96)*

*#MPSC_UPSC_Katta Team*
*_कृपया लेख कॉपी पेस्ट करतांना नावसाहित करावा...
%%%%%%%%%%%%%%%%%%%




स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती
---------------–------------------------/






🌹भारतमातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची,संसाराची राखरांगोळी करणारा खरा महात्मा...समाजातील  अस्पृश्यता घालविण्यासाठी अनन्यसाधारण कार्य करणारा एक व्रतस्थ, समाजसुधारक, हळव्या मनाचा कवी,मराठी भाषा सुधारक,विचारवंत,भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचा खंदा समर्थक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त 
विनम्र अभिवादन !!!! 
🌹🌹🙏
#$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
      2  
।। आज स्वातंत्र्यवीर 
विनायक दामोदर सावरकर यांची जयंती  । । 

#विनायक दा.#सावरकर म्हणजे#एक धगधगती ज्वाला.
आणि
। ।आधुनिक भारताचा शिल्पकार।।
।।भगवती स्वतंत्रतेचे उपासक।।
    ।।हिंदीचे कट्टर पुरस्कर्ते।।
    ।।थोर समाज सुधारक।।
    ।।भाषा शुध्दी पुरस्कर्ते।।
     ।।लिपी शुध्दीकर।।
।।अभिनव भारताचे संस्थापक।।
      ।।युग प्रवर्तक।।
     ।।कट्टर विज्ञान निष्ठ।।
     ।।महा संस्कृती अभिमानी।।
     ।।हिंदु ह्रदय सम्राट।।।
।।महान राजकिय दृष्ठा।।
।।भारताचा बहादूर बेरिस्टर।।
    ।।भारताचे स्फुर्तीस्थान।।
    ।।महान कर्मयोगी।।
     ।।आधुनिक अगस्ती।।
     ।।नवे शंकराचार्य।।
      ।।प्रखर बुध्दीवादी।।
        ।।महा मृत्युंजयी।।
       ।।क्रांतीचा मुकूटमणी।।
       ।।हिंदुत्वाचे भाष्यकार।।
        ।।भारताचा मँझीनी।।
।।प्रतिभा संपन्न,कादंबरीकार,निबंधकार,।।
     ।।शब्दपैलू,इतिहासकार,चरित्रकार,।।
     ।।नाटककार,महाकवी,कथाकार,।।
     ।।।स्वातंत्र्याचे शिल्पकार।।।
=स्वातंत्र्यवीर विनायकक दामोदर सावरकर=
       की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने।
        लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने।।
        जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे।
          बुद्ध्याची वाण धरिले करी सतीचे।।
*या वीरास कोटी कोटी अभिवादन*
®®®®®®®®®®®®®®©©©
3
********************************

*_२८ मे - स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मदिन_*

********************************

जन्म - २८ मे १८८३
मृत्यू - २६ फेब्रुवारी १९६६

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. 

सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.

यह तीर्थ महातीर्थो का है, 
मत कहो इसे काला पानी, 
तुम सुनो यहॉं के धरतीके, 
कण-कण से गाथा बलिदानी।

सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना लंडनला अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. 

ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 

मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. 

मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. 
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. 

पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर, असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर; अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.

सावरकरांनी १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक "नाट्यकला प्रसारक मंडळाने" रंगभूमीवर आणले. सावरकरांनी सन्यस्तखड्ग नाटक लिहिले. त्यातील शतजन्म शोधताना हे नाट्य गीत अंगावर रोमांच उभे करते. हे नाटक बळवंत नाटक मंडळाने १९३२ मध्ये सादर केले. उत्तरक्रिया हे त्यांचे नाटक भारत भूषण संगीत मंडळाने सदर केले.

दत्ताराम यांना लहानपणी ऐका रानीत कीचकवध नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेवून सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सैरंध्री उत्कृष्ट करवून घेतली. १९४३ साली सांगलीस झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शाताद्भी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मन सावरकरांना मिळाला आहे. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.

यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, 
बयॉं मेरा बंदा हिंदवाला हुँ, 
यह हिंदोस्ता मेरा 
खुशी के दौर दौर है यां रंजो मुहन पहिले 
बहार आती है पीछे और खिजां गिरदे चमन पहिले

१९२१ मध्ये अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी उर्दू आणि देवनागरी हस्ताक्षरात लिहिलेल्या २ गझल अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरां मधला देशाभिमान आणि लेखक जागा असल्याच्या खुणा पटवणाऱ्या अशा या गझला व गीत आहे.

विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी निधन झाले. 

विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली !

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*

*संदर्भ : इंटरनेट*

********************************
भाग 4
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
                  *🔸स्वातंत्र्यवीर🔸*
       *🔸विनायक दामोदर सावरकर.🔸*

*🔹आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती...!🙏*

*विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.*

*सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.*

*सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.*

*मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.*

*राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली.*

*कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.*

*इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.*

*राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.*

*स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.*

*अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).*

*अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.*

*अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.*

*स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.*
*स्त्रोत: विकिपीडिया.*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
@@@@@#@@#####
भाग 5
                                                  
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🤽🏻‍♂⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️✍🚩

           *स्वातंत्र्यवीर विनायक* 
              *दामोदर सावरकर*                                                                               (महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक) 
         *जन्म : २८ मे १८८३*
(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
     *मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६*
      (दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके : मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म : हिंदू
प्रभाव : शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी
वडील : दामोदर विनायक सावरकर
आई : राधाबाई दामोदर सावरकर 
पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)
अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास
*भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.*
           विनायक दामोदर सावरकर  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
⚜️ *चरित्र*
           सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
                       राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
                    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
           अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
                 अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

♨️ *सावरकरांचे जात्युच्छेदन*
              अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

🐄 *गाय हा एक उपयुक्त पशू*
             ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
                  एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

⛓️ *सात बेड्या*
           सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
         जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

🛕 *हिंदू महासभेचे कार्य*
          रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
                        एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
                   सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

🗽 *सावरकर स्मारके*
                     पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
🏤 *संस्था*
          सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
✍️ *मृत्युपत्र*
                       ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.

📚 *ग्रंथ आणि पुस्तके*
           वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उ:शाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें

📕 *इतिहासविषयावरील पुस्तके*
            १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
📙 *कथा*
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
📚 *कादंबऱ्या*
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

📜 *पुरस्कार*
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.
                     ’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
✍️ *सावरकरांवर लिहिलेली पुस्तके*
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:

अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
 (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर,  बाळाराव (संकलक)                            १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
🎭🎞️ *सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम*
अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
 
            🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
        ♾♾♾ *11* ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲



महात्मा गौतम बुद्ध

 महात्मा गौतम बुद्ध माहिती 
®®®®®®®®®®®©©©©©




बुध्द त्याच्याही डोक्यात आहे
आणि बुध्द
माझ्याही डोक्यात आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
तपस्वी समजतो
आणि मी
वैज्ञानिक दृष्टीकोणाचा जनक

बुध्द त्याच्याही मनात आहे
आणि बुध्द
माझ्याही मनात आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
हिंसेच्या विरुध्द समजतो
आणि मी न्यायाच्या बाजूचा
 
बुध्द त्याच्याही घरात आहे
आणि बुध्द
माझ्याही घरात आहे

फरक मात्र एवढा
तो बुध्दाला फक्त
डोळे मिटलेला समजतो
आणि मी डोळस

बुध्द त्याच्याही दृष्टीत आहे
आणि बुध्द
माझ्याही दृष्टीत आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
धर्मसंस्थापक समजतो
आणि मी
मानवतेचा संदेश

बुध्द त्यानेही वाचला
आणि बुध्द
मी सुध्दा वाचला

फरक मात्र एवढा 
तो बुध्दाला फक्त
शांतीचं प्रतीक समजतो
आणि मी क्रांतीचं 
#BuddhaPurnima

बुद्ध पौर्णिमेच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शिवशुभेच्छा.🌹🌹🙏🙏🌹🌹
∆∆∆∆∆∆π∆ππ∆ππππππππππππ
भाग 2

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
🎈गया.( बोधगया )

💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
🎈वैशाख पौर्णिमा.

💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
🎈सारनाथ.

💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
🎈पाच.

💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
🎈बुद्ध,धम्म,संघ.

💐 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
🎈तीन.

💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
🎈गौतम बुद्ध.

💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
🎈यशोधरा.

💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
🎈राहूल.

💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
🎈तथागत गौतम बुद्ध.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय हार्दीक शुभे
च्छा..........

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹pandit D shankar
@@@@@@@@@@@@@@##३३
भाग 3
धम्मचक्र
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------तथागत गौतम बुद्ध .

२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
----तथागत गौतम बुद्ध .

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. 
---------तथागत गौतम बुद्ध .

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. 
------तथागत गौतम बुद्ध .

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. 
-----तथागत गौतम बुद्ध .

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके!
---------तथागत गौतम बुद्ध .

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
--------- तथागत गौतम बुद्ध
@@@################


सिद्धार्था,
करुणेच्या अखंड महासागरा, शांतिदूता...
आमच्या बापजाद्यांनी डोंगरांत,
दगडांत तुझं *विश्वरूप* कोरलं,
आम्हाला काळजात तुझं
*शांतीस्वरूप* कोरण्याची सद्बुद्धी दे!!
'मी'पणाच्या भूकेपोटी फक्त
स्वसुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांना
इतरांच्या दुःखाकडे निदान
पाहण्याची तरी दृष्टी दे.
इतरांचा द्वेष, मत्सर करणाऱ्या
मानसिक विषाला
आत्मिक समाधानाचा उतारा दे.
धर्माच्या दावणीला स्वतःला
अंधभक्तीने बांधणाऱ्यांना
मानवतेसाठीचा मुक्त विचार कळू दे.
गौतमा,
तुझ्या करुणामय डोळ्यांनी
जगाकडे पाहण्याचा,
अंतःस्थ करुणेचा प्रवाह जाणण्याचा,
दुःखितांच्या अंधाऱ्या आयुष्याला
प्रकाशाचं कोंदण होण्याचा
प्रसंग लाभू दे.
विचारांना परिपक्वता अन्
कल्पनेला पंख फुटू दे.
बोधिसत्त्वा,
सकलांच्या भल्यासाठी अन्यायाच्या आकाशकड्यांना
छेदणाऱ्या विचारांची प्रेमळ माणसं
कोण्या एकट्याची उरत नाहीत,
मग तो पैगंबर असो की महावीर,
ज्ञानेश्वर असो की बुद्ध!
आणि त्यांच्या विचारांचा, समतेचा,
कर्तृत्वाचा वारसा अंतःकरणात
आणि कृतीतून जपू पाहणाऱ्यांमुळेच
नांदतेय शांती, सुख, समृद्धी, संवेदनशीलता
मनामनात,समाजात.
बुद्धा,
तू अजूनही डोकावतोयस
आशेच्या किरणांतून,
निरागस प्रेम करणार्‍या हृदयांतून,
खळखळून हसणाऱ्या आनंदातून,
परोपकाराच्या जाणिवेतून आणि
सहकार्य करणाऱ्या हातांतून.
तथागता,
तुझी शोधक वृत्ती
सतत अंगीकृत होऊ दे!
मुक्त, भल्या विचारांची संगत
अन् यशासोबत अपयश
पचवण्याचीही सहनशक्ती दे!!
*बुद्धपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा!!*
✍🏻 आयुब शेख, पुणे
🙏🏻🌹🌸💐🌺🏵️🙏🏻

###############################

.      *गौतम बुद्ध म्हणतात*-
जो मानव जीवनात पंचशीलतेचे पालन करत.व अष्टांग मार्गावर चालेल, त्याच्या जीवनात शांतता व समाधान येऊन तो *निर्वाण* पदाकडे वाटचाल करेल.
 .        *पंचशील*
1)कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे.
2)खोटे न बोलणे.
3)कामवासने पासून अलिप्त राहणे.(व्यभिचार)
4)चोरी न करणे.
5) मादक पदार्थ पासून दूर राहणे.
       *अष्टांग मार्ग*
1) *सम्यक दृष्टी*--अंधविश्वास व भ्रमापासून मुक्त दृष्टी.
2) *सम्यक संकल्प*--योग्य व उच्च चिंतन,विचार. 
3) *सम्यक वाचा*--सत्य व निष्कपट वाणी.
4) *सम्यक कर्मान्त*-- काया,वाचा, मनाने पवित्र व स्वच्छ कर्म करणे.
5) *सम्यक आजीविका*-- कुणावरही अन्याय,त्रास,दु:ख न देता जीवन जगणे.
6) *सम्यक व्यायाम*--स्वतःला चांगले वळण,सवयी लावत चित्ताला संयमित करणे.
7) *सम्यक वृत्ती*--सतत जागरूकता, सजकता,सावधान असणे.
8) *सम्यक समाधी*--सत्याविषयी सखोल मनन,चिंतन व समर्पण.
*अशांत,अस्थिर,दुर्बल मनाला शांत,स्थिर,सबल करण्याचे काम पंचशील व अष्टांगिक मार्ग होय*.
🙏🏻🙏🏻🙏🏻


Monday, 24 May 2021

रजा नियम संहिता

 राजा नियम संहिता 
राजेचे प्रकार 
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍




परिपूर्ण माहिती साठी खालील लिंक ला स्पर्श करा

https://drive.google.com/file/d/1Wj7Kcr0N9K-jf0Qw1y2bNSPOkXBIUyJJ/view?usp=drivesdk
👍👍👍👍👍👍👌👌👌👍👍👍👍👍

नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22

 नवीन शैक्षणिक वर्ष 2021-21

बाबत अपडेट



_*【 D.D.】*_

दिनांक: २४/०५/२०२१

_*आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईनच होणार...?*_

*मुंबई:*
● _यंदा 15 जूनपासून सुरू* होणारे नवीन शैक्षणिक वर्षही ऑनलाइन वर्गातच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण, उजळणी वर्ग, स्वाध्याय पुस्तिका असे पर्याय शिक्षण विभाग उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे._

● _शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणेच यंदा 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही कोरोना स्थिती पूर्णपणे आटोक्यात आली नाही._

● _मुंबई, पुणे भागांतील रुग्णसंख्या स्थिर असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे._

*राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले* : 
_सध्या विद्यार्थी शिकत असलेल्या इयत्तेमध्ये नेमक्या किती बाबी विद्यार्थ्यांना समजल्या, याबाबत शिक्षकांनाही अंदाज येत नसल्याने उजळणी घेतली जाणार आहे._

● _दरम्यान त्यासाठी स्वतंत्र अभ्यास साहित्यही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विकसित करत आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय पुस्तिकांचाही पर्याय आहे._

● _यंदा सर्वच इयत्तांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी दूरदर्शनकडे प्रस्तावही पाठवला आहे._
👍👍👍👍👌👌🏽👍👍👍👍

Thursday, 13 May 2021

ऑनलाईन स्वाध्याय आत्ता नवीन रुपात

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने 15 मे 2021पासून ऑनलाईन स्वाध्याय आत्ता पुन्हा नव्या जोमाने सुरू.......



प्रति, 
*सर्व विध्यार्थी, शिक्षक आणि पालक* 
*शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी*

*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana* - या आठवड्यात परत येत आहे! (दि 15 मे २०२१ पासून) 👦👩🎓🔢

*National FLN मिशन* आणि *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन* किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने *पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१)* पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत. 

*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत* म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल. 

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
*https://wa.me/918595524519?text=Namaskar*

*आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे*

ह्या आठवड्या (दि. १५/०५/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध:
कोणासाठी - *१ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी*
माध्यम - *मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू*
विषय - *गणित*
१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील

*दिनकर टेमकर* 
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र
-------–संकलन -बळवंत राठोड----

Sunday, 9 May 2021

कोरोना लसीकरण नोंदणी

 18ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरण नोंदणी कशी करावी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन 















*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी*
----- 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
Login site is
www.cowin.gov.in
*Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
*Register/ Sign in yourself 
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.
*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा
*आधार कार्ड क्रमांक किंवा इतर आय डी प्रूफ भरा 
* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
* schedule appointment वर क्लिक करा. नंतर
*पिन कोड टाका (आपला पोस्ट कोणता आहे तो) किंवा जिल्हा सिलेक्ट करा
*Sesstion निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.
*Vaccin center व Date निवडा.
*Appointment book करुन ती coform करा.
*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
*त्यमुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.
 
🙏🙏🙏🙏
-----– लस घ्या सुरक्षित राहा------



नवीन अपडेट 
*WhahtsApp द्वारे प्रमाणपत्र असे डाउनलोड करा*

*आपला स्नेही संजय नागे अ.म.प्रा शि.संघ दर्यापूर*

*यासाठी आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करावा लागेल. हा क्रमांक 9513151515 आहे.*
*क्रमांक सेव्ह झाल्यानंतर व्हॉट्स अॅप उघडा. यानंतर, चॅट लिस्टवर जाऊन संपर्क शोधा.*

*मिळाल्यानंतर, चॅट उघडा आणि डाउनलोड प्रमाणपत्र येथे टाईप करा.*

*यानंतर, व्हॉट्सअॅप चॅटबॉट तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.*

*ओटीपी तपासा आणि प्रविष्ट करा. यानंतर चॅटबॉट तुम्हाला* *व्हॉट्सअॅपवर COVID-19 लस प्रमाणपत्र पाठवेल.*

*येथून आपण ते डाउनलोड करू शकता.*

*व्हॉट्सअॅपमध्ये एरर असेल तर तुम्ही पूर्वीप्रमाणेच CoWIN पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपशी संपर्क साधू शकता*

किंवा 

*वरील पोस्ट मधील मोबाईल नंबर ने covid-19 सर्टिफिकेट डाऊनलोड होत नसेल तर 9013151515 मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव करून व्हाट्सअप वरून प्रमाणे डाऊनलोड करून घ्या निश्चित डाऊनलोड होईल*



Thursday, 6 May 2021

छत्रपती राजे शाहू महाराज

 छत्रपती शाहू महाराज






















●══════════════════●
*■  राजर्षी शाहू महाराज  ■*
●══════════════════●
*राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.*
*स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 6 मे 1922 रोजी वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.*
-------/////----////------------/////----////-----
मनासारखा राजा व राजासारखं मन!"
आयुष्यभर उपेक्षित,दलित,शोषित,समाजाला स्वाभिमानाने व ताठ मानेने जगता यावं यासाठी एका प्रस्थापित व्यवस्थेशी आजन्म संघर्ष करणारे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना -–-- दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!!!
---/////-////--------///                     
            
          *राजर्षी शाहू महाराज*
         *जन्म : २६ जून १८७४*
(लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल)
         *मृत्यू : ६ मे १९२२*
                  (मुंबई)
        *अधिकारकाळ*
     इ.स. १८८४ - इ.स. १९२२
          *अधिकारारोहण*
          एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा
राजधानी : कोल्हापूर
पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले
पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
राजाराम ३
उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले
वडील : आबासाहेब घाटगे
आई : राधाबाई
पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे : भोसले
राजब्रीदवाक्य :जय भवानी
शाहू महाराज भोसले  छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
💁‍♂️ *जीवन*
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

🔸 *कार्य*
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे

महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

💎 *जातिभेदाविरुद्ध लढा*
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

📖 *शैक्षणिक कार्य*
शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 

🏤 *शैक्षणिक वसतिगृहे*
शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

🔮 *इतर कार्ये*
शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. 

🤹‍♂️🎭 *कलेला आश्रय*
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

🇮🇳 *स्वातंत्रलढ्यातील योगदान*
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

🙋🏻‍♂️ *पारंपिरिक जातिभेदाला विरोध*
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*
'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)
राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)
राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)
राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)
समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)
🎞️📺 *चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका*
'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)
📜 *पुरस्कार*
शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)
🗽 *सन्मान*
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या,  स्वरुपात दिला जातो.

     -----///®®®®®®®®®®®®®®®
    *उदयोजक राजा : राजर्षी शाहू महाराजा* 
============= अनिल भुसारी, तुमसर 8999843978 
                छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे काम म्हटलं की त्यांनी जातीभेद निर्मूलन, शिक्षण, वसतिगृह यांची केलेली पायाभरणी, समाजसुधारक अशीच त्यांची प्रतिमा उभी राहते.  समाजसुधारणे बरोबर कला, खेळ, सांस्कृतिक आणि उदयोजक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. या लेखात आपण शाहू महाराजांच्या उद्योगक्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत माहिती पाहू या. शाहू महाराजांच्या काळात आणि आता सुद्धा भारताला कृषीप्रधान देश समजल्या जातो. कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रामुळेच टिकून आहे. स्वातंत्र्यानंतर देशात औधोगिक विकास मोठया प्रमाणात झाला. शाहू काळात देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती. शाहू महाराजांनी उदयोग क्षेत्रात केलेल्या कामाचं अभ्यास करतांना तो काळ लक्षात घ्यावं लागेल. ज्या काळात लोक रूढी -परंपरा सोडून बदल स्वीकारायला तयार नव्हते. त्या काळात महाराजांनी शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या क्षेत्रात मोठया प्रमाणात सुधारणा घडवण्याबरोबर शेती आधारित व्यवसायाची पायाभरणी सुद्धा केली. 
           राजर्षी शाहू महाराजांचे 1894 साली राज्यरोहण झाले तेव्हा कोल्हापूर संस्थानातील जमीन 12,94,196एकर होती. ती 1922 साली 14,26,535 एकर इतकी वाढली. 
++ *पाटबंधारे धोरण :-*  1896 -99 या काळात संस्थानात भयंकर दुष्काळ पडला होता. महाराजांनी लोकांकरिता अन्नधान्याचा व जनावरांकरिता गवत चाऱ्याचा वेळीच पुरवठा करून अनेकांचे प्राण वाचवले होते.  दुष्काळा सारख्या संकटावर कायमची मात करता यावी म्हणून मोठी योजना तयार केली.  महाराजांनी 1902 मध्ये 'सार्वत्रिक पाटबंधारे धोरण ' जाहीर करून स्वतंत्र 'पाटबंधारे खाते' निर्माण केले. शेती हा व्यवसाय पाण्यावर अवलंबून असल्यामुळे नव्या विहिरी, नवे तलाव, छोटे बंधाऱ्यांची निर्मिती शेती व्यवसायाला नवसंजीवनी दिली. 
++ *राधानगरी धरण :-*  दुष्काळावर मात करता यावी म्हणून छोटया धरणांची निर्मिती केली, परंतु मोठया प्रमाणात कायम शेती करिता व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठी योजना तयार केली. संस्थानाचा आकार, त्या काळातील तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि आर्थिक स्रोत लक्षात घेता ही योजना म्हणजे शाहू महाराजांनी उदयोगात जे भरीव काम केले त्यातील हा 'मुकुटमणीच ', म्हणजेच *राधानगरी धरण.* या धरणाचे 1909 साली काम सुरु झाले. 1918 पर्यंत या प्रकल्पाकरिता 14 लाख रुपये खर्च झाले होते. सह्याद्रीच्या घाटातून वाहणाऱ्या *भोगावती नदीचा* जलप्रवाह अडवून राधानगरी धरणाची निर्मिती महाराजांनी केली. कोल्हापूर आज जे सुजलाम - सुफलाम दिसत आहे त्याची पायाभरणी महाराजांनी निर्माण केलेल्या राधानगरी धरणात आहे. कोल्हापूरच्या शेतीचा विकास बघायचा असेल तर इतर भागातील राजकारणी,  अधिकारी व शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कोल्हापूरला जावून यावे. शाहू महाराजांच्या काळात नदीचे पाणी अडविणे, धरण बांधणे धार्मिक दृष्टया अधर्म - पाप समजल्या जायचं. त्या कालखंडात महाराजांनी हे काम करणे म्हणजे किती त्यांचे धैर्य आणि काळाच्या किती पुढे पाहणारे होते हे समजून घ्या. 
++ *सुधारित शेती पद्धती :-*  लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतातून पिकाचे अधिक उत्पादन होणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविण्यासाठी काही नव्या सुधारणा लक्षात घेवून शेतकऱ्यांना आधुनिक औजारे, बी -बियाणे, रासायनिक खते आणि आधुनिक मशागत पद्धतीचे ज्ञान व प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्यात. स्वातंत्र्यानंतर भारतात आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी 1965 साल उजाडावं लागले. शाहू महाराज म्हणतात, *"देशाचे कल्याण ज्यांना करायचे आहे त्यांनी प्रथमतः आपल्या शेतीच्या सुधारणांकडे लक्ष दिले पाहिजे."* कोरोना सदृश्य परिस्थितीत देशाला शेती आणि शेतकरी जगवत आहे. 
++ *शेतीत नव-नवीन प्रयोग :-* शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाबरोबर शेतकऱ्यांना अधिक मोबदला व व्यापाराच्या दृष्टीने उपयोगी असणारे पीक शेतकर्यानी घ्यावे यावर सुद्धा महाराजांनी भर दिला. शेतात नव नवीन प्रयोग करतांना वेलदोडे, कोको, रबर, ताग, अंबाडी, कॉफी, बटाटे, कंबोडियन कापूस ही पिके लावण्याचा प्रयोग केला. खतांचे सुद्धा नव - नवीन प्रयोग महाराजांनी केले. हिरडा, जांभूळ, काजू, साग, आंबा, फणस यांच्या बागा लावण्यास प्रोत्साहन दिले. त्या काळात संस्थानातील *पन्हाळा टी. नं. 4* भारतातील इतर राजे राजवाडे बोलवत असत. म्हणजे संस्थानातील माल त्या काळात निर्यात होत असे. महाराजांच्या या उपक्रमशीलतेचा गुण आजही कोल्हापूरच्या मातीत आहे तो गुण महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी घ्यावा. महाराजांनी कोल्हापुरात 1912 साली *स्वतंत्र शेती संस्था* स्थापन करून त्या अंतर्गत शेती औजारांचे म्युझियम उघडले होते. आज जसे शेती औजारांचे व इतर शेती वस्तूंचे प्रदर्शन भरविले जातात, त्याची पायाभरणी महाराजांनी 100 वर्षा आधी केली आहे. काळाच्या पुढे पाहणारे महाराज मात्र इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने व जात व्यवस्थेने संक्रमित झालेल्या मीडियाने समोर येऊच दिले नाही. 
++ *सहकाराची पायाभरणी :-* इंग्रजांच्या काळात संस्थानिकाने सहकार तत्वाचा स्वीकार करून, सहकारातून उद्योगाची निर्मिती करणे हा विचार करणे सुद्धा शक्य नव्हते. तेव्हा महाराजांनी सहकाराला 1912 साली कायद्याचे स्वरूप देवून *"सहकारी संस्थाविषयक कायदा* बनविला. भारतातील *सहकाराचे अग्रदूत म्हणजेच शाहू महाराजा* आहेत.  हे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या किती लोकांना माहित आहे हा संशोधननाचा विषय होईल. सहकार म्हणून जेवढे उद्योग व्यवसाय आहेत त्यांनी शाहू महाराजांचे आभार मानून त्यांच्या विचार - कार्याचा प्रसार करायला हवा. 1912 साली सहकार कायदा बनविल्यानंतर त्याअंतर्गत कोल्हपूरात 1913 साली भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली *'अर्बन को -ऑप -बँक '* आणी *'बलभीम को -ऑप -बँकेची '* स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार 1921 पर्यंत कोल्हापूर संस्थानात 37 सहकारी सोसायट्यांची स्थापना झाली होती. या कायद्याचेच फलित म्हणजे फक्त कोल्हापूर मध्येच नव्हे तर संपूर्ण देशात सहकाराचे जाळे विणून ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक सक्षम होवू शकला. हे शेतकऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. 
++ *विविध उद्योगाची निर्मिती :-* 1894 ला महाराजांचे राज्यरोहण झाले. त्यावेळेस संस्थांनात एखादा मोठा उद्योग किंवा कारखाना नावाला सुद्धा नव्हता. लोकांना काम मिळावं, आर्थिक परिस्थिती सुदृढ करायची असेल तर पाश्चात्य राष्ट्रासारखे उद्योगांची निर्मिती करणे आवश्यक आहे, हा विचार करून त्यांनी सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षीका पालन उद्योग, रंगाचे कारखाने, राळे तयार करण्याचा कारखाना, सूत रंगवण्याचा व्यवसाय, सुती कापड उद्योग अशा अनेक प्रकारच्या उद्योगाला आणि उद्योग करणार्यांना महाराजांनी प्रोत्साहन दिले. संस्थानात व बाजूच्या भागात कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत होते म्हणून कापड उद्योगाला चालना देण्यासाठी 27 सप्टेंबर 1906 रोजी *'शाहू छत्रपती मिल्स '* ची स्थापना केली. शाहू महाराजांच्या उद्योगशील दृष्टीमुळे संस्थानात अनेक ठिकाणी अनेक फॅक्ट्रीज सुरु झाल्या. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा उद्योगशील दृष्टकोन घेवून विचार व कार्य केले तर आजचा  *बहुजन तरुण* उद्योगात नक्कीच उंच भरारी घेईल, म्हणून तरुणांनी जात - धर्माच्या पलीकडे जावून शाहू महाराजांचे सुधारणावादी विचार स्वीकारणे आवश्यक आहे. 
अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायात महाराजांनी 125 वर्षा पूर्वी जे भरीव योगदान दिले आणि नव - नवीन सुधारणा घडवून आणल्यामुळे आजचा शेतकरी इतकी प्रगती करू शकला, हे शेतकऱ्यांनी आणि स्वतःला शेतकरी नेते म्हणवणाऱ्यांनी विसरू नये. समाजातील आर्थिक विषमता संपविण्याकरिता शासनाला महत्वाची भूमिका बजवावी लागेल. कोरोनामुळे उध्दभवलेल्या आर्थिक संकटातून निघण्याकरिता शाहू महाराजांनी दिलेली दिशा व सूत्र आजही अनुकरणीय ठरेल.  आणि त्यांचे अनुकरण करणे हेच त्यांना स्मृती दिनी अभिवादन करणे होय...
============ #########$$
🌹दिनांक 06 मे 1922🌹

कोल्हापूर संस्थानाचे राजे (1884 ते 1922), कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक, संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देणारे,  सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे, वंचितांचे राजे, महाराजांचे महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिन निमित्त कोटी कोटी प्रणाम. 

त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच  मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. 

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये त्यांनी अथक प्रयत्न केले. 

त्यांनी बहुजनांसाठी शिक्षणप्रसार, आंतरजातीय विवाहाला मान्यता, पुनर्विवाहाचा कायदा, अस्पृश्यता निवारण, कृषिविकास, शेतकऱ्यांना कर्जे, सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा, देवदासी प्रथा बंदी, जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. 

त्यांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ राधानगरी धरणाची उभारणी, शैक्षणिक वसतिगृहे, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती केली. 

अशा या महान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मुंबईतील पन्हाळा लॉज मध्ये पहाटे 5.55 मिनिटांनी ह्रुदयविकाराने निधन झाले.
@@@@@@@#####@@@!!!!!!

स्वामी विवेकानंद

 युवा दिन स्वामी विवेकानंद *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿        🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳                  ▬ ❚❂❚❂❚ ▬   ...