सूर्यमाला आकाश गंगा

 आकाश गंगा माहिती 
*



*********************



*_🌍☀️सूर्यमाला☀️🌍_*

*🔸 तारे व ग्रह :-*
*बहुतेक चांदण्या लुकलूकताना दिसतात म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो, अश्या चांदण्याना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशी असतात. सूर्य हा तेजस्वी तारा असून सुर्यमालेचा प्रमुख आहे.*

*🔸 ग्रह :-*
*काही खगोल लुकलूकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते. यांना ग्रह (plannet) असे म्हणतात. पृथ्वी हा एक ग्रह असून सर्व ग्रह परप्रकाशीत असतात.*

*🔸खगोल :-*
*तारे व ग्रह सर्वसाधारणपणे गोलच असतात. ख-म्हणजे आकाश. म्हणून आकाशातले गोल म्हणजे खगोल होत.*

*🔸उपग्रह :-*
*काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. आशा ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलांना त्या ग्रहांचे ' उपग्रह' असे म्हणतात. उदा. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो म्हणून तो पृथ्वीचा उपग्रह मानला जातो.*

*🔸 लघुग्रह :-*
*सुर्यमालेमध्ये मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हणतात.*

*🔸 बटूग्रह :-*
*नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराचे खगोल आहेत त्यांना "बटूग्रह" असे म्हणतात. प्लुटोसारख्या ग्रहांचा यामध्ये समावेश होतो.*

*🔸धूमकेतू :-*
*धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात.*
*सूर्याच्या उष्णतेमुळे यामधील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते,हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात त्यांमुळे धूमकेतू लांबट पिसाऱ्या सारखे दिसतात. यांच्यात दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचितच आकाशात दिसतात.*

*🔸उल्का :-*
*आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडतांना दिसतो. या घटनेला "उल्कापात" म्हणतात.*
*अनेक वेळ उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना "उल्का" असे म्हणतात.*

*🔸 अशनी :-*
*काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांनाच "अशनी" असे म्हणतात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर असाच अशनी अपघाताने तयार झालेलं आहेत.*

*🔸सूर्य हा आपला मुख्य तारा असून सूर्याभोवती 8 ग्रह फिरतात.*

*⭕नोट :- वरील माहिती शक्य तितकी अद्ययावत व अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही नजरचुकीने काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्यावे..🙏🏻*

*⭕लेखन व संकलन :- वृषभ मो.दातखोरे (9764-76-26-96)*

*#MPSC_UPSC_Katta Team*
*_कृपया लेख कॉपी पेस्ट करतांना नावासाहित करावा..._*
**************************+++++++++
भाग 2
*_🌘💫🪐 ग्रहांची माहिती 🪐💫🌒_*

*🔸बुध :-*
              *उपग्रह - ०*
            *आंसांचे कलणे - २.०*
             *परिवलन काल - ५८.६५ (दिवस)*
             *परिभ्रमण काल - ०.२४ वर्ष*

*🔸 शुक्र :-*
            *उपग्रह - ०*
            *आंसांचे कलणे - १७७.२*
            *परिवलन काल - २४३ दिवस* 
            *परिभ्रमण काल - ०.६१ वर्ष*

*🔸पृथ्वी :-*
             *उपग्रह - १*
            *आंसांचे कलणे - २३.५*
          *परिवलन काल - २४ तास*
           *परिभ्रमण काल - १ वर्ष (३६५ दिवस)*

*🔸मंगळ :-*
                *उपग्रह - २*
               *आंसांचे कलने - २५.२*
               *परिवलन काल - २४.६ तास*
               *परिभ्रमण काल - १.८८ वर्ष*

*🔸गुरू :-*
                 *उपग्रह - ६३*
                *आंसांचे कलणे - ३.१*
                *परिवलन काल - ९.९ तास*
               *परिभ्रमण काल - ११.८६ वर्ष*

*🔸 शनी :-*
                     *उपग्रह - ५२*
                    *आंसांचे कलणे - २६.७*
                    *परिवलन काल - १०.६ तास*
               *परिभ्रमण काल - २९.४६ वर्ष*

*🔸युरेनस :-*
               *उपग्रह - २७* 
             *आंसांचे कलणे - ९७.९*
              *परिवलन काल - १६ तास*
              *परिभ्रमण काल - ८४ वर्ष*

*🔸नेपच्यून :-*
                  *उपग्रह :- १३*
               *आंसांचे कलणे - २८.८*
                *परिवलन काल - १८ तास*
                *परिभ्रमण काल - १६४ वर्ष*


*⭕नोट :- वरील माहिती शक्य तितकी अद्ययावत व अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही नजरचुकीने काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्यावे...🙏🏻*

*⭕लेखन व संकलन  :- वृषभ मो.दातखोरे (9764-76-26-96)*

*#MPSC_UPSC_Katta Team*
*_कृपया लेख कॉपी पेस्ट करतांना नावसाहित करावा...
%%%%%%%%%%%%%%%%%%%




Comments

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती