महात्मा गौतम बुद्ध

 महात्मा गौतम बुद्ध माहिती 
®®®®®®®®®®®©©©©©




बुध्द त्याच्याही डोक्यात आहे
आणि बुध्द
माझ्याही डोक्यात आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
तपस्वी समजतो
आणि मी
वैज्ञानिक दृष्टीकोणाचा जनक

बुध्द त्याच्याही मनात आहे
आणि बुध्द
माझ्याही मनात आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
हिंसेच्या विरुध्द समजतो
आणि मी न्यायाच्या बाजूचा
 
बुध्द त्याच्याही घरात आहे
आणि बुध्द
माझ्याही घरात आहे

फरक मात्र एवढा
तो बुध्दाला फक्त
डोळे मिटलेला समजतो
आणि मी डोळस

बुध्द त्याच्याही दृष्टीत आहे
आणि बुध्द
माझ्याही दृष्टीत आहे

फरक मात्र एवढा

तो बुध्दाला फक्त
धर्मसंस्थापक समजतो
आणि मी
मानवतेचा संदेश

बुध्द त्यानेही वाचला
आणि बुध्द
मी सुध्दा वाचला

फरक मात्र एवढा 
तो बुध्दाला फक्त
शांतीचं प्रतीक समजतो
आणि मी क्रांतीचं 
#BuddhaPurnima

बुद्ध पौर्णिमेच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शिवशुभेच्छा.🌹🌹🙏🙏🌹🌹
∆∆∆∆∆∆π∆ππ∆ππππππππππππ
भाग 2

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
🎈गया.( बोधगया )

💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
🎈वैशाख पौर्णिमा.

💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
🎈सारनाथ.

💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
🎈पाच.

💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
🎈बुद्ध,धम्म,संघ.

💐 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
🎈तीन.

💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
🎈गौतम बुद्ध.

💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
🎈यशोधरा.

💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
🎈राहूल.

💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
🎈तथागत गौतम बुद्ध.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय हार्दीक शुभे
च्छा..........

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹pandit D shankar
@@@@@@@@@@@@@@##३३
भाग 3
धम्मचक्र
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------तथागत गौतम बुद्ध .

२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
----तथागत गौतम बुद्ध .

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. 
---------तथागत गौतम बुद्ध .

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. 
------तथागत गौतम बुद्ध .

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. 
-----तथागत गौतम बुद्ध .

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके!
---------तथागत गौतम बुद्ध .

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
--------- तथागत गौतम बुद्ध
@@@################


सिद्धार्था,
करुणेच्या अखंड महासागरा, शांतिदूता...
आमच्या बापजाद्यांनी डोंगरांत,
दगडांत तुझं *विश्वरूप* कोरलं,
आम्हाला काळजात तुझं
*शांतीस्वरूप* कोरण्याची सद्बुद्धी दे!!
'मी'पणाच्या भूकेपोटी फक्त
स्वसुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांना
इतरांच्या दुःखाकडे निदान
पाहण्याची तरी दृष्टी दे.
इतरांचा द्वेष, मत्सर करणाऱ्या
मानसिक विषाला
आत्मिक समाधानाचा उतारा दे.
धर्माच्या दावणीला स्वतःला
अंधभक्तीने बांधणाऱ्यांना
मानवतेसाठीचा मुक्त विचार कळू दे.
गौतमा,
तुझ्या करुणामय डोळ्यांनी
जगाकडे पाहण्याचा,
अंतःस्थ करुणेचा प्रवाह जाणण्याचा,
दुःखितांच्या अंधाऱ्या आयुष्याला
प्रकाशाचं कोंदण होण्याचा
प्रसंग लाभू दे.
विचारांना परिपक्वता अन्
कल्पनेला पंख फुटू दे.
बोधिसत्त्वा,
सकलांच्या भल्यासाठी अन्यायाच्या आकाशकड्यांना
छेदणाऱ्या विचारांची प्रेमळ माणसं
कोण्या एकट्याची उरत नाहीत,
मग तो पैगंबर असो की महावीर,
ज्ञानेश्वर असो की बुद्ध!
आणि त्यांच्या विचारांचा, समतेचा,
कर्तृत्वाचा वारसा अंतःकरणात
आणि कृतीतून जपू पाहणाऱ्यांमुळेच
नांदतेय शांती, सुख, समृद्धी, संवेदनशीलता
मनामनात,समाजात.
बुद्धा,
तू अजूनही डोकावतोयस
आशेच्या किरणांतून,
निरागस प्रेम करणार्‍या हृदयांतून,
खळखळून हसणाऱ्या आनंदातून,
परोपकाराच्या जाणिवेतून आणि
सहकार्य करणाऱ्या हातांतून.
तथागता,
तुझी शोधक वृत्ती
सतत अंगीकृत होऊ दे!
मुक्त, भल्या विचारांची संगत
अन् यशासोबत अपयश
पचवण्याचीही सहनशक्ती दे!!
*बुद्धपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा!!*
✍🏻 आयुब शेख, पुणे
🙏🏻🌹🌸💐🌺🏵️🙏🏻

###############################

Comments

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती