नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22

 नवीन शैक्षणिक वर्ष 2021-21

बाबत अपडेट



_*【 D.D.】*_

दिनांक: २४/०५/२०२१

_*आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईनच होणार...?*_

*मुंबई:*
● _यंदा 15 जूनपासून सुरू* होणारे नवीन शैक्षणिक वर्षही ऑनलाइन वर्गातच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण, उजळणी वर्ग, स्वाध्याय पुस्तिका असे पर्याय शिक्षण विभाग उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे._

● _शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणेच यंदा 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही कोरोना स्थिती पूर्णपणे आटोक्यात आली नाही._

● _मुंबई, पुणे भागांतील रुग्णसंख्या स्थिर असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे._

*राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले* : 
_सध्या विद्यार्थी शिकत असलेल्या इयत्तेमध्ये नेमक्या किती बाबी विद्यार्थ्यांना समजल्या, याबाबत शिक्षकांनाही अंदाज येत नसल्याने उजळणी घेतली जाणार आहे._

● _दरम्यान त्यासाठी स्वतंत्र अभ्यास साहित्यही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विकसित करत आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय पुस्तिकांचाही पर्याय आहे._

● _यंदा सर्वच इयत्तांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी दूरदर्शनकडे प्रस्तावही पाठवला आहे._
👍👍👍👍👌👌🏽👍👍👍👍

Comments

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती