भारतीय राष्ट्रीय प्रतीके
*सामान्यज्ञान ( भारत राष्ट्रगीत, राजमुद्रा, राष्ट्रध्वज, कॅलेंडर, प्रतिज्ञा )*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*🇮🇳 भारताचे राष्ट्रगीत :*
*✓जन गण मन*
*✓ रचना -- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर*
*✓(मूळ गीत ५ कडव्यांचे, मात्र पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता) हे गीत गुरुदेवांनी पहिल्यांदा बंगाली भाषेत लिहिले. १९११ मध्ये अबिद अली यांनी त्याचे हिंदी भाषांतर केले.*
*✓प्रथम गायन -- २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन, अध्यक्ष बिशन नारायण दास)*
*✓राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता: २४ जानेवारी १९५०; (गायनाचा कालावधी: ५२ सेकंद)*
========================
*🇮🇳राष्ट्रीय गीत :*
*✓वंदे मातरम् (निवड: बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'आनंदमठ' कादंबरीतून)*
*✓ प्रथम गायन : १८९६ चे कोलकाता अधिवेशन. (अध्यक्ष: रहिमतुल्ला सयानी)*
=======================
*🇮🇳 राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) :*
*✓राष्ट्रचिन्हाची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील स्तंभावरून.*
*✓राष्ट्रचिन्हास मान्यता : २६ जानेवारी १९५०*
*✓राष्ट्रचिन्हाचे स्वरूप : सिंह, घोडा, बैल व हत्ती या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे. चार सिंहांपैकी तीन दर्शनी बाजूस व एक पाठीमागे.*
*✓राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल असे 'धर्मचक्र' आहे.*
*✓राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हा देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड 'मुंडक उपनिषदातून' केली आहे.*
*✓'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य बनविण्याची जबाबदारी पं. मदनमोहन मालवीय यांच्याकडे होती.*
==========================
*🇮🇳भारताचा राष्ट्रध्वज :*
*✓२२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली.*
*✓स्वरूप -- तिरंगा • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा.*
*केशरी (भगवा) : शौर्य व त्यागाचे प्रतिक.*
*पांढरा शांतता व पावित्र्य.*
*हिरवा : समृद्धीचे प्रतिक.*
*✓मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर निळसर (Navy Blue) रंगाचे अशोक चक्र निवडले असून त्यास २४ आरे आहेत.*
*✓ हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर '२ : ३' इतके असते.*
*✓ राष्ट्रध्वजाची संकल्पना व रचना मछलीपट्टण (आंध्र प्रदेश) येथील पिंगाली वेंकय्या या शेतकऱ्याने मांडली.*
*✓कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीवस्त्रापासून व विशिष्ट ९ आकारांतच तयार करणे बंधनकारक आहे.*
*✓ राष्ट्रध्वजाचा आकार : अतिमहनीय व्यक्तींच्या विमानावर ४५०४३०० मिमी; राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोटारीवर २२५x१५० मिमी. आकाराचा ध्वज (तिरंगा) लावतात.*
========================
*🇮🇳 राष्ट्रीय कॅलेंडर :*
*✓ मान्यता -- २२ मार्च १९५७ शके कालगणनेनुसार रचना (इसवीसनाच्या मागे ७८ वर्षे) • राष्ट्रीय कॅलेंडरनुसार (शके कालगणना) नववर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा)*
*✓ ग्रेगेरियन कॅलेंडरशी सांगड घालताना, चैत्र शुध्द प्रतिपदा दरवर्षी २२ मार्च रोजी व लीप वर्षात २१ मार्च रोजी येते.*
*✓ या कॅलेंडरनुसार वर्षाचे ३६५ दिवस मानतात.*
*✓१९४७ मध्ये भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली.*
=========================
*🇮🇳 राष्ट्रीय प्रतिज्ञा :*
*✓भारत माझा देश आहे... (India is My Country...)*
*✓ ही प्रतिज्ञा सर्वप्रथम १९६२ साली पी. वेंकट सुब्बा राव यांनी तेलगू भाषेत लिहिली.*
*✓ १९६३ साली विशाखापट्टणम् येथील शाळेत या प्रार्थनेचे प्रथम वाचन झाले.*
■■■■■■■■■◆◆◆◆■

No comments:
Post a Comment