Sunday, 20 September 2026

परिसर अभ्यास -सामान्य ज्ञान

 परिसर अभ्यास-सामन्य ज्ञान



*ऑनलाइन शिक्षण समहु*

*🌞भौगोलिक माहिती‌*🌞

----- परिसर अभ्यास ------


*(1) सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत.*


*(2) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आहे.*


*(3) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे.*


*(4)भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल एककात मोजतात.*


*(5) लीप वर्षात 366 दिवस असतात.*


*(6) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे.*


*(7) शुक्राला पहाटेचा तारा असेही म्हणतात.*


*(8) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे.*


*(9) सूर्यापासून सर्वात लांब ग्रह नेपच्यून आहे.*


*(10) मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात.*


*(11) पृथ्वीला जल ग्रह म्हणतात.*


*(12) सूर्यग्रहण अमावस्येला होऊ शकते.*


*(13) सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात.*


*(14) सूर्यमालेत सूर्य हा तारा आहे.*


*(15) चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे.*


*(16) 21 जूनच्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाकडे कलतो.*

*(17) 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.*


*(18) शनी ग्रहाभोवती कडा आहे.*


*(19) पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा सूर्य आहे.*


*(20) सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात.*


*(21) सूर्य हा हायड्रोजन व हेलिअमचा बनलेला आहे.*


*(22) सूर्य हा ग्रह नसून तारा आहे.*


*(23) ग्रह स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरतात.*


*(24) तारे मात्र फक्त स्वतःभोवती फिरतात.*


*(25) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आहे.*


*(26) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 29% जमिन आहे.*


*(27) सर्वात प्रकाशमान ग्रह शुक्र आहे.*


*(28) सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह शुक्र आहे.*


*(29) मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.*


*(30) पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण म्हणतात.*


*(31) पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन म्हणतात.*


*(32) बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे.*


*(33) चंद्र दररोज आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो.*


*(34) बटु ग्रह म्हणजे नेपच्यूननचे पलीकडील ग्रह.*


*(35) सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह बुध आहे.*


*(36) सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह पृथ्वी आहे.*


*(37) सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास 8 मिनिट 20 सेकंद कालावधी लागतो.*


*(38) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास दिन म्हणतात.*


*(39) वर्षातील सर्वात मोठा दिवस 21 जून आहे.*


*(40) पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवसांचा काळ लागतो.*


*(41) वर्षातील सर्वात लहान दिवस 21 डिसेंबर आहे.*


*(42) खग्रास सूर्यग्रहण अमावस्येला होतो.*


*(43) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते.*


*(44) चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.*


*(45) समुद्राची भरती आणि ओहटी यातील अंतर 12 तास 25 मिनिटे असतो.*

===================

No comments:

Post a Comment

परिसर अभ्यास -सामान्य ज्ञान

  परिसर अभ्यास-सामन्य ज्ञान *ऑनलाइन शिक्षण समहु* *🌞भौगोलिक माहिती‌*🌞 ----- परिसर अभ्यास ------ *(1) सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत.* *(2) सूर...