Saturday, 5 June 2021

जागतिक पर्यावरण दिन

 ☘️☘️🌳🌳🌳🌲🌲🪴🪴
*5 जून जागतिक पर्यावरण दिन*
☘️☘️☘️☘️☘️☘️


********************************
    *५ जून - जागतिक पर्यावरण दिन*
********************************

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle.

सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.

मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाय योजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.

आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करत आहोत : पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.

*पर्यावरण विज्ञान*

यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती-मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.

*पर्यावरण शिक्षण*

यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.

*पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप*

बिलिसी येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-
* पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
* पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
* अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
* पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
* वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
* पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
* प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.

आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************
भाग 2
आला, पर्यावरण दिन।

     अरे बापरे,एक झाड लावायचं आहे. माझ्या बाईने ना,उन्हाळी सुट्टीत अभ्यास दिला होता, कुंडीत एक रोप लावा,ते सूर्यप्रकाशाच्या दिशेत ठेवा. त्याला रोज पाणी घाला. रोप कसं वाढतं त्याचं निरिक्षण करा. आणि वहीत निरिक्षण लिहा.अन् आँनलाईन शाळा सुरू झाली की मला ते निरिक्षण वाचून दाखवा.पण मी हा अभ्यास केलाच नाही.
     कोणी उन्हाळी सुट्टीत अभ्यास देतं का? पण हे माझ्या बाईंना कोण सांगणार? त्या असं म्हणतात, सुट्टीत मुलांनी छंदात रमावं,आणि हे झाड लावणं,निरिक्षण करणं,हा छंदाचा भाग बरं का?पण आता काय करु?
झाड लावायचं राहिलचं आपलं.... चित्र काढली, गाणी म्हटली, उन्हाळी ऋतूतील फळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आस्वाद घेत खाल्ली. त्याचे फोटो बिटो काढले. मनसोक्त दोरीउड्या मारल्या, कँरम,बुध्दिबळ खेळले. लाँकडाऊन नसतं, तर गावी जाऊन निसर्गात फेरफटका मारलाही असता पण ते शक्य नाही. पण कुंडीत झाड लावणं शक्य होतं....कशी विसरली मी?...आता शाळा सुरु होईल... आणि या कुंडीतल्या रोपाविषयी विचारलं, तर काय सांगायचं?... असं अंदाजे अंदाजे रोप कसं वाढलं ते सांगू या का?...नाहीतरी बाई कुठे कुंडीतले रोप बघायला घरी येणार आहेत?आणि शाळेत कुंडी घेऊन या,असं सांगणार आहेत... शी..काय मी अन् काय माझी मत...बाईने फोटो काढून whatsapp वर पाठव म्हटलं तर..शेजारांच्या कुंडी सोबत फोटो काढता येईल म्हणा,पण ते बाईंना,फसवल्यासारखं होईल. आणि बाईंना फसवणं...नको रे बाबा... चुकीचं वागणं होईल ते...किती रागावतील त्या... मागे ना, मी दादाने करून दिलेला होमवर्क दाखवला होता... अक्षर ओळखलं ना,त्यांनी माझ्या दादाचं...असा ओरडा पडला विचारू नका... त्या ओरड्यापेक्षा भयानक होतं,त्याचं शांत राहणं...त्यांच्या नजरेला मी चूकवत होते किती तरी दिवस.... त्यापेक्षा आता लक्षात आले आहे तर रोप लावू या. नाहीतरी आज पर्यावरण दिन आहे. मला कसं माहीत?असं वाटलं ना तुम्हाला?अहो, वर्गातील whatsapp गृपवर बाईंचा मेसेज पाहिला ना मी... तेव्हाचं तर मला रोप लावण्याचा होमवर्क आठवला...
       आता आईला कुंडी आणायला व तुळशीचं रोप आणायला सांगितलं पाहिजे.आताच सांगते,"ए आई  बाजारातून एक कुंडी, माती, व तुळशीचं रोप घेऊन ये.मला रोप
लावायचं आहे".माझी आईना,तिचं एक बरं आहे. काही असं चांगलं मागितलं की ती पटकन आणून देते. मग मी काय संध्याकाळ पर्यंत झाड लावणार... निरिक्षण करणार... वहीत लिहणार...
      तसं आमच्या शाळेतही वृक्षारोपण होतं बरं का?...छान कार्यक्रम असतो तो...वृक्षदिंडी काढतो आम्ही.. पण या करोना महामारीने सर्वच थांबवलं आहे. शाळेत आमच्या कुंड्या आहेत. आम्ही निरिक्षण करायचो.परिपाठात वृक्षांचं,पर्यावरणचं महत्त्व नेहमी सांगितलं जायचं.नाही म्हणायला आँनलाईन अध्यापनात अधनमधनं बाई पर्यावरणचं महत्त्व सांगतात.
        करोना महामारी आणि आँक्सिजन याबाबत बोलताना त्यांनी झाडांच महत्त्व मलाच तर विचारलं होतं. मी पटकन सांगितलं होतं.. झाडामूळे प्राणवायू मिळतो. झाड लावली पाहिजेत...आणि मीच...रोप लावायला टंगळमंगळ केली. पर्यावरणात ना?फक्त झाडंच नाही तर सर्व जीवजंतू येतात. प्रत्येक जीव दुसऱ्यावर अवलंबून असतो. एक जीव पर्यावरणातून नष्ट झाला. तर त्याच्यावर अवलंबून असणारा दुसरा जीव नष्ट होतो. पर्यावरणाची साखळी बिघडते. पर्यावरण धोक्यात येतं..हे सर्व मी विज्ञानात, भुगोलात शिकले आहे. पण शिक्षणाबरोबर कृती पण हवी ना?...मी तर लहान आहे.. पण मोठी माणसं ? त्यांना तर ही वंसुधरा गुलामच वाटते... अफाट लोकसंख्याने तर मुंबईत किड्यांमुंग्यासारखं जिणं माणसाच्या वाटी आलं आहे.तरी हल्ली बरं, जंगलतोडीला ,प्राण्याच्या शिकारीला बंदी आहे.अभयारण्याचं रक्षण सरकार करते. पर्यावरण रक्षणासाठी चांगली माणसं धडपडत आहेत मग मी नको का?काही करायला?... कुंडीत रोप लावणं आणि तेही तुळशीचं...माहीत आहेत मला, तुळशीच्या रोपाचे महत्त्व... मागे मी औषधी वनस्पती प्रकल्पात तुळशीची माहिती गोळा केली होती. तुळशीचं चित्र असं मस्त रेखाटलं होतं.समोर छान अक्षरात माहिती लिहली होती. बाईंना ना ,माझी वही भलतीच आवडली होती. परिपाठात सर्वांना वही दाखवली होती.मोठ्या सरांनी तर मला बक्षीस म्हणून एक पेन दिलं होतं. तसं मला कोणी कौतुक केलं की भारी आवडतं.मी जोमाने कामाला लागते. तर आता मी लागते कामाला... रोप लावते..पर्यावरण राखते...तुम्ही पण पर्यावरण रक्षण करा हं....

                               
                  सायली मोरे
                        आग्रीपाडा, मुंबई.
★★★★★☆★★★★★★★★★
भाग 3

🌱🌴🌳🌱🌴🌳🌱🌴🌳

*आजचा अनमोल विचार...*

सु.क्र.-153

*-----------------------------------------*

*निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.*
                  --- साने गुरुजी

*-----------------------------------------*



आपण ज्या प्रमाणे आपल्या आईवर प्रेम करतो त्याच प्रमाणे निसर्गावर प्रेम करायला पाहिजे कारण जशी आई आपणास जन्म देते त्याच प्रमाणे *निसर्ग हे संपूर्ण जीवसृष्टीला जीवन जगण्यास पोषक वातावरण देतो.*
🌴
आज *5 जून जागतिक पर्यावरण दिन* म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे तसेच समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच *पर्यावरणाविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे.* हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे.
💎
बरं मला सांगा आपण नेहमी अशी जागतिक दिन साजरे करतो पण त्या दिनाच्या मुख्य हेतूला पुसटसा स्पर्श क्वचितच होत असतो. ढोबळ मानाने आपण अश्या प्रकारे दिन साजरा करतो..,
📺 *मीडिया द्वारे प्रस्तावना व माहिती प्रसारण.*
📱 *एकमेकांना व सामूहिक दिनाच्या शुभेच्छा देणे.*
🖼 *दिनावर कोरडी चर्चा करणे.*
📞 *लई झालं तर दिना वर वादविवाद स्पर्धा व इतर स्पर्धा आयोजित करणे.*
⛺ *पेंडॉल टाकून एखादा कार्यक्रम घेणे.*
🌱 *मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम थाटामाटात घेणे.*
🎥 *फोटो, शूटिंग, रिपोरटिंग, सेल्फी चा धुमाकूळ घालणे.*
📟 *रात्री टिव्ही पुढं बसून बातमीची वाट पाहणे व बातमी आल्यास स्वतःला त्यात शोधणे.*
📃 *वर्तमानपत्रात मोठं मोठ्या बातम्या फोटोसह प्रदर्शित होणे.*
👆🏻 असा हा आपला कोणत्याही जागतिक दिन साजरा करण्याचा नेहमीचा कार्यक्रम... 😊
मी असं का म्हणत असेल तुमच्या लक्षात आलं असेल की, असे *जागतिक दिन साजरा करण्यात कोणता हेतू सफल होतो?* ही तर फारच चिंतनीय बाब आहे.
😕
*खरच सांगा हाय की नाही हे सोंगाड..*
आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त जर आपण एखादा,
*संकल्प*
केला तर मला वाटते ते योग्य होईल,
बरं हा *संकल्प नुसता सामूहिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञा सारखा नसायला पाहिजे.*
तो संकल्प मनाने स्वीकारून त्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे.
🥇
बघा जुन्या काळी अशी दिन साजरी होत नसे पण संकल्प मात्र फारच जिद्दीने पूर्ण कराराचे.
💥
मला या पर्यावरण दिना निमित्त आवर्जून,
*बालकवी*
*त्र्यंबक ठोंबरे यांच्या निसर्गावरील कवितांचा* या ठिकाणी उल्लेख करू वाटतो.
यांच्या *कवितांचा केंद्रबिंदू हा निसर्ग असायचा.* त्यांच्या कवितांमध्ये निसर्गातील विविध दृष्यात मानवी भावना झळकताना दिसतात. त्यांच्या,
🌸 *फुलराणी*
🌄 *सूर्यकिरण*
🌅 *अरुण (पहाट)*
या अविस्मरणीय कवितांमध्ये कल्पनाशक्तीच्या आधारे *निसर्गातील विविध गोष्टी जणू सजीव असल्याचे स्पर्श होते.* त्यांच्या या निसर्गाचे वर्णन मध्ये अत्यंत भावस्पर्शी व *मनाला भेदणारी कल्पना* खूपच सुंदररित्या मांडलेली आहे.
त्याच प्रमाणे,
🌸
▪️ *फुलराणी*
▪️ *आनंदी आनंद गडे*
▪️ *श्रावणमास*
▪️ *औदुंबर*
या निसर्गवर्णन रुपी कविता फारच सुंदर वाटतात त्यात,

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फिरे,

नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,

मोद विहरतो चिहिंकडे
आनंदी आनंद गडे!

*ही कविता तर निसर्ग वर्णनाचा सार वाटते.*
🌹
हे झालं मनापासून एखादी गोष्ट स्वीकारणे, *फोटो आणि सेल्फी साठी काम करणाऱ्या स्वार्थी लोकांच्या गर्दी पासून दूर राहून स्वतःला सिद्ध करून दाखवू.*
🍁
असो आज या जागतिक पर्यावरण दिना निमित्त आपण पर्यावरण बचाव साठी एखादा *संकल्प* हाती घेऊ त्यातील एक भीषण समस्या म्हणजे *जंगलतोड* त्यासाठी *वृक्षांची कत्तल* थांबवून त्यांचे *रोपण व संगोपन* करणे या कार्यात स्वतःला वाहून घेऊ हीच आजच्या दिवशी *शपथ* घेऊन,
*बालकवी त्र्यंबक ठोंबरे*
यांच्या *स्मृतिदिना* निमित्त श्रद्धांजली वाहूया...
🙏🏻

*निसर्गावर चार ओळी...*

वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन करून
हा दिन साजरा करावा

निसर्गावर प्रेम करणार
असा मनाने संकल्प धरावा

निसर्ग बाचावाच्या बाबीकडे 
नेहमीच आपण गंभीरतेने पहावा

दिस-रात्र विचार पर्यावरणाचा
हाच आमचा छंद असावा

मग,
*विचार पर्यावरणाचा हाच आमचा छंद असावा...*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
  *जागतिक पर्यावरण* 
          दिनाच्या
    मनःपुर्वक हार्दिक
          शुभेच्छा...
🌸🌻🌸🌻🌸🌻🌸

*कोरोनाला* विसरू नका,
*घरातच राहा, सुरक्षित राहा...*
👏🏻

बरं पुनः भेटू एका अनमोल विचारासह.

---------///// शुभ सकाळ /////---------

*----------------------------------------*
*@ जलील खान पठाण-* 5 जून 2021 पुसद (यवतमाळ) 9657728665
*----------------------------------------*
🌱🌴🌳🌱🌴🌳🌱🌴🌳
भाग 4
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 
*घेऊया  “वन ट्री चॅलेंज”*

निसर्गाकडून आजवर माणसाने फक्त नि फक्त घेतलेलेच आहे पण परतफेड मात्र कधी केली नाही.  स्वार्थासाठी झाडे तोडली परंतु तोडली त्या प्रमाणात झाडे लावली नाही व लावली ती झाडे वाचवली नाहीत म्हणून आज मानवाला विकतच्या ऑक्सिजनवर जीवन जगणे भाग पडले आहे. कोरोनाने आपल्या आयुष्यात काय महत्वाचे आहे व काय नाही या सारख्या खूप सार्‍या गोष्टींचा नव्याने विचार करण्यास भाग पाडले आणि आपल्या धकाधकीच्या जीवनात रमलेले आपण लॉकडाऊनच्या काळात आपल्या अवतीभवती सजगतेने पाहू लागलो, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ लागलो, फुलांचा सुगंध, पानांचे सौंदर्य, पक्षांचा किलबिलाट, सुर्योदय सुर्यास्त हे किती मोहक आहे याची आपल्याला ठळकपणे जाणीव होऊ लागली.
कोरोनाने  आपल्याला काय शिकवले या पेक्षा आपण कोरोनापासून काय शिकलो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा व त्यावर मिळणाऱ्या प्रामाणिक उत्तरावर विचार व कृती करायला हवा आणि या अनुभवत असलेल्या भयानक वर्तमानापासूनही आपण आजही काही शिकलो नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच.  
आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. यासाठी खरी जागृती देशाची पुढील पिढी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये होणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर पर्यावरण संरक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. आजवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव जागृती करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.  
मुलांमधील ही जागृती त्यांच्या पालकांपर्यंत नक्कीच पोहचते. व्यापक स्तरावर या गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे.  विद्यार्थी समाजात पर्यावरणाचे महत्व समजावून देण्यासाठी खास माध्यम बनू शकतात.  कोरोनाच्या रूपात पृथ्वीने स्वतःला दुरुस्तीला काढले आहे, तिला मोकळा श्वास घ्यायचा आहे असे म्हटले जात आहे. मग आपण आपल्या पद्धतीने तिला मोकळा श्वास घेण्यासाठी का प्रयत्न करू नये..? जास्तीत जास्त झाडे लावून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून आपण पृथ्वीला मोकळा श्वास उपलब्ध करून देऊ शकतो.  
पुढील काळातही अशा अचानक येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल विचार करायला हवा. हल्ली कोरोनाकाळात मिळालेल्या मोकळ्या वेळात खूप सारे चॅलेंज एकमेकांना देताना दिसत आहे. मग आपण पर्यावरण संरक्षणासाठी हा चॅलेंज ट्रेंड  वापरला  तर..? या विचाराने मी व माझ्या विद्यार्थ्यांनी “वन ट्री चॅलेंज” घेण्याचे ठरवले आहे. या जूनमध्ये येणाऱ्या पावसाळ्यात माझे विद्यार्थी त्यांच्या घरात जेवढे सदस्य आहेत तेवढी  झाडे लावणार आहेत व त्याची वर्षभर काळजी घेऊन ती वाढविणार आहेत.  मी व माझे विद्यार्थी जास्तीत जास्त झाडे लावणार आहोत कारण कोरोना कडून आम्ही खूप काही शिकलोत. विकतच्या ऑक्सिजनपेक्षा भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची काळजी घेऊया. प्रत्येक वेळेस शासनानेच काहीतरी करावे अशा अपेक्षेपेक्षा आपणही वैयक्तिक पातळीवर आपल्यापासून सुरुवात करण्याची खूप गरज आहे. म्हणून हा आमचा प्रयत्न .. 
मुलांना द्या पर्यावरण रक्षणाची  शिक्षा .. 
हीच असेल आपल्या जीवनाची सुरक्षा..!!
 आज पर्यावरण वाचवा, तरच जग वाचेल .  
 चला तर मग वाट कसली बघता...? मी व माझ्या विद्यार्थ्यांनी तर पर्यावरणसंवर्धनासाठी 'वन ट्री चॅलेंज' स्वीकारले आहे व आपणासही वन ट्री चॅलेंज देत आहोत.  आपण तयार आहात ना हे वन ट्री चॅलेंज स्वीकारणेसाठी..?... तयार राहा
®®®®©©©©©©©©©©©©©
भाग 5
⬆️

 *5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन - World Environment Day म्हणून साजरा केला जातो.* 

1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.

 *पर्यावरण दिन का साजरा करतात?* 

जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, *"आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय - स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे."* 

पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.

 *यावर्षीची थीम काय आहे?* 

2021 वर्षासाठीची थीम आहे *इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.* 

वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.

जगभरातमध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50 टक्के प्रवाळ (Corals) नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90 टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज आहे.

पर्यावरणाची ही हानी रोखत, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न, ही यावर्षीची थीम आहे. *2021पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.* 

जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या परिसंस्था - इकोसिस्टीम (Ecosystem) चं नुकसान रोखत, ते थांबवून ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीलाही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल (Climate Change) कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत, असं युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर म्हटलंय.

 *यावर्षी यजमान देश कोण?* 

 *पाकिस्तानकडे यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद आहे* . दरवर्षी एका देशाकडे या दिनाचं यजमानपद असतं आणि या देशात अधिकृत कार्यक्रम पार पडतात.

जगभरात विविध व्यक्ती, संस्था, उद्योग यांनी पर्यावरणाच्या हितासाठी काही उपक्रम राबवावेत, आपल्या कार्यपद्धतीत पर्यावरणस्नेही वा पर्यावरणपूरक बदल घडवून आणावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
 *#GenerationRestoration हा हॅशटॅग यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ठरवण्यात आलाय.* 

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामद्वारे आयोजित करण्यात येणारे कार्यक्रमही त्यांच्या वेबसाईटवर पाहता येतील.
@@@#@@@@@""'''@@@@###
भाग 6
*जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना इवल्याशा रोपट्याकडून शुभेच्छा.*🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


*इवलंसं रोपटं मी*
*तू म्हणालास तर मरून जाईन,*

*ओंजळभर पाणी दे मला*
*आयुष्यभर तुझ्या कामी येईन,*

*दिलं जीवदान मला तर*
*तुला जगायला प्राणवायू देईन,*

*जगवलंस मला तर* 
*तुझ्या देवांसाठी फुलं देईन,*

*फुलवलंस मला तर*
*तुझ्या मुलांसाठी फळं देईन.*

*तळपत्या उन्हामध्ये* 
*तुझ्या कुटुंबाला सावली देईन,*

*तुझ्या सानुल्यांना खेळावया*
*माझ्या खांद्यावर झोका देईन,*

*तुझ्या आवडत्या पाखरांना*
*मायेचा मी खोपा देईन,*

*कधी पडला आजारी तर* 
*तुझ्या औषधाला कामी येईन,*

*झालो बेईमान जरी मी* 
*शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन.*
        
             *🌿  एक रोपटं  🌿*

 *🌴🌳🌴🌳 पावसाळ्याला सुरुवात होते आहे. झाडे लावा झाडे जगवा*🌴🌳🌴🌳
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍




No comments:

Post a Comment

स्वामी विवेकानंद

 युवा दिन स्वामी विवेकानंद *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿        🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳                  ▬ ❚❂❚❂❚ ▬   ...