जय जय महाराष्ट्र माझा
मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा
*भिती ना आम्हां तुझी मुळीही*
*गडगडनार्या नभा...*
*आस्मानाच्या सुलतानीला*
*जवाब देती जीभा...*
*सह्याद्रीचा सिंह गर्जतो...*
*शिवशंभू राजा दरीदरीतून*
*नाद गुंजला महाराष्ट्र माझा...*
*जय जय महाराष्ट्र माझा*
*गर्जा महाराष्ट्र माझा...*
*महाराष्ट्र दिन व कामगार*
*दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!* 💐🙏🏻🙏🏻💐🙏🏻
---------------/////---////////------------
*माझा महाराष्ट्र*
*भव्य हिमालय तुमचा आमचा,*
*केवळ माझा सह्यकडा*
*गौरीशंकर उभ्या जगाचा ,*
*मनात पूजिन रायगडा*
*असे वसंत बापट म्हणतात.* *मराठी माणूस कोठेही असला तरी त्याला मायदेशाविषयी सदैव ओढ वाटत असते. महाराष्ट्रीयन माणसांव्यतिरिक्त इतरांनाही महाराष्ट्राचे असेच आकर्षण वाटलेले आहे.*
*या महान राष्ट्राला फार थोर प्राचीन परंपरा आहे. प्रत्यक्ष भगवान रामचंद्र आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. छत्रपती शिवरायांची ही कर्मभूमी आहे. थोर संतमहंतांचा सहवास या राष्ट्राला लाभलेला आहे.*
*महाराष्ट्र सुजलाम् , सुफलाम् आहे. महाराष्ट्राचे मन सह्यकड्याप्रमाणे निर्भय आहे. विशाल मनाने सर्वांना सामावून घेणारे अाहे. अमोल नररत्ना़नी ही भूमी समृद्ध झाली आहे. अशा या पवित्र भूमीत मी जन्माला आले याचा मला अभिमान वाटतो.*
---------------–-----------------------------/----------
*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
*१ मे - महाराष्ट्र दिन* कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…… दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस म्हणजे १ मे. ६० वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली . मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत . महाराष्ट राज्य आणि त्यासंबाधित अनेक पैलूचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी आपणा सर्वाना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जान सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक आहे .
खर पहिला गेला तर १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेली अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.
आता यानंतर आपण संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि त्यानंतरचा महाराष्ट्र यावर नजर टाकूया…मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करार अंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली. संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.
या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट,शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा समावेश होता. यानंतरच्या काळात आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली . शाहीर अमर शेखांसह अनेक शाहिरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 🌐 *1 मे - महाराष्ट्र दिन*
1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.
महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.
देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा. 🏵️ २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
♨️ *हुतात्म्यांची नावे*
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे
सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहित
सीताराम दुलाजी घाडीगावकर
🇮🇳 *जयहिद*
–----------/-// ---------------------------------
*आज १ मे*
*आज महाराष्ट्र दिन*
*महाराष्ट्र स्थापनेचा इतिहास.*
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रा चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्रबाहेरच असेलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रोत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटीशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. १९२० मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधी यांनी मान्य केला होत. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषत: पंडित नेहरु संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
१९३८ मध्ये पटवर्धन व १९४० मध्ये ग. त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याने व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेतलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यिकांनी पाठविले, ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. १९४६ मध्ये भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का. पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचनेसाठी नेमलेल्या कमिशनने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.
दार कमिशन व जे.व्ही.पी. कमिटी
डिसेंबर १९४८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी. कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णांच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे, असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेल यांनी मुंबईचा विकास गुजराती भाषिकांनी केल्याने नमूद केले.
फाजल अली आयोग
डिसेंबर १९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस. एम. जोशी, धनंजय गाडगीळ यांच्यासह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. १९५५ मध्ये आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत व सगळ्यांना सारखी लागू केलली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादासाठी एकभाषिकाचे तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचे. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळ ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकशी ' आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त कमी होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्याची नव्हती, असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरुंनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालच पाहिजे', हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसतरंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले.
एस.एम.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्रे यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला आणि विरोधकांवर कठोर व बोचरी टीका केली. त्यांनी आपल्या भाषणांतून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्यां चा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
२० नोव्हेंबर, १९५५ रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटील यांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' तर मोरारजी देसाई यांनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तसेच गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल', अशी विधाने केली. लोकांनी संतापून सभा उधळली. 21 नोव्हेंबर, 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 15 जणांना प्राण गमवावा लागला. जानेवरी-फेब्रुवारी 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. मोरारजींच्या सरकारने सत्तेचा दुरूपयोग करून निष्ठूरपणे 80 लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणार्याष अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर, १९५६ रोजी केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाला महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणार्याड निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधी यांनी नेहरू यांचे मन वळविले. द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरातला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची, अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास आणि उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली, असा दावा गुजराती भाषिक करीत होते. त्याचे 'व्याज' म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' हे नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र' असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.
संकलन. *#संजीव_वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
('निर्मिक'च्या दिवाळी अंकातून साभार)
------👍👍👍👍-----
*विषय :-* *माझी महाराष्ट्र भूमी *
माझी महाराष्ट्र भूमी, जसे बकुळीचे फूल
दूर दूर पोचवी गं , अंतरीचा परीमल . . . !
कधी ओवी ज्ञानेशाची , कधी गाथा तुकोबांची
शब्द झाले पूर्णब्रम्ह, गाऊ महती संतांची. . . . !
संतकवी, पंतकवी, संस्कारांचा पारीजात .
रूजविली पाळेमुळे, अभिजात साहित्यात. . . !
कधी भक्ती, कधी शक्ती, कधी सृजन मातीत
नृत्य, नाट्य, कला,क्रीडा, धावे मराठी ऐटीत. . !
माझी महाराष्ट्र बोली, लोकभाषा अंतरीची .
भाषा कोणतीही बोला, नाळ जोडू ह्रदयाशी . . !
कधी मैदानी खेळात, कधी मर्दानी जोषात.
माय मराठी खेळते, पिढ्या पिढ्या या दारात. ..!
कोसाकोसावरी बघ, बदलते रंग रूप.
कधी वर्हाडी वैदर्भी, कधी कोकणी प्रारूप. . . !
महाराष्ट्र लोककला, रसिकांच्या काळजात.
कधी गाणे, कधी मोती, सृजनाच्या आरशात. . !
महाराष्ट्र भाषिकांची, माय मराठी माऊली जिजा,विठा,सावित्रीची,तिच्या शब्दात साऊली . !
अन्य भाषिक ग्रंथांचे, केले आहे भाषांतर
विज्ञानास केले सोपे, करूनीया स्थलांतर. . . !
शिकूनीया लेक गेला, परदेशी आंग्ल देशा
माय मराठीची गोडी, नाही विसरला भाषा. . . !
नवरस,अलंकार, वृत्त छंद,साज तिचा .
अय्या,ईश्य,उच्चाराला, प्रती शब्द नाही दुजा.. !
माय मराठीने दिला, कला संस्कृती वारसा
शाहीरांच्या पोवाड्यात,तिचा ठसला आरसा. !
महा राष्ट्राने या दिली, नररत्ने अनमोल.
किती किती नावे घेऊ, घुमे अंतरात बोल. . .!
माझी महाराष्ट्र गाथा, कार्य तिचे अनमोल .
शब्दा शब्दात पेरला , तीने अमृताचा बोल. . !
विजय यशवंत सातपुते. पुणे.
👍👍👍👍👍👍👍👍👌
*आज १ मे महाराष्ट्र दिन*
🚩◆◆ *माझा महाराष्ट्र - एक झलक*◆◆🚩
★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा.उध्दव ठाकरे
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : भगतसिंग कोशारी
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
*महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश
सगळ्यांना*
*महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
*श्री. नवनाथ विष्णु सांगळे*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:
Post a Comment