26जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन
26जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन
*26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन* हा दिवस म्हणजे कायम आठवणीत राहणारा स्मरणात राहणार दिवस वर्षभर आपण जे काम करतो त्या कामाचा कंटाळा घालण्याचा दिवस म्हणजेच 26 जानेवारी पण गेली 12 वर्षे हा दिवस ज्या धुमधडाक्यात साजरा करता आला तो यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे करता आलं नाही. याची रुखरुख कायम मनात घर करून राहत आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस आनंदामध्ये उत्साहात साजरा होत असतो. एक धमाल असते एक मजा असते एक मस्ती असते धमाल असतो विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद पाहिल्या नंतर मन भरून येत. वर्षातला पहिला महिना वर्षातला पहिला सण आणि त्याचबरोबर लोक लोकशाही राज्यातील मोठा उत्साह हा प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदात साजरा करतो. पण या कोरोनामुळे यावर्षी सर्वकाही स्तब्ध झालं फक्त आणि फक्त या कोरोनामुळे म्हणून गेली बारा वर्षातील एक खंत मनात राहिली.गेली बारा वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम होत असे कार्यक्रम यावर्षी होणार नाही हे कुठेतरी मनामध्ये खंत वाटत आहे आणि तो त्या मागील बारा वर्षाचा इतिहास आठवत आहे. या आठवणीत अजून भर म्हणजे बेलमंडलकराचे येणारे फोन व फुटनाकराच्या भेटी यामुळे अजून हूर हूर वाटत आहे.
उद्या पासून शाळा चालू होतील पण आजचा दिवस पुन्हा येणार नाही.
फक्त आठवण हुरहूर म्हणजे 26जानेवारी 2021👍👍🙏🙏
बळवंत राठोड
Comments
Post a Comment