माझा लेख 2 पाखरानो वेल कम
पाखरानो वेल कम
*पाखरांनो Wel Come*
✍️👩🎤👨💻🧜🏻♀️🧚🏽♂️🕊️
*तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात अत्यानंद होतो की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 10 महिने बंद असलेली आपली शाळा पुन्हा नव्या उत्साहाने आपण सुरुवात करतोय इयत्ता 5वी ते 8वी दिनांक 27 जानेवारी 2021...पासून.तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत*🌹🎍💐💐
*आता सुरू झालेली शाळा मात्र आधीच्या शाळेसारखी नसेल..अर्थात कोरोनाच्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे..'जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही' या सूत्राने व शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून आपण पुन्हा नव्याने सुरवात करतोय.. 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा' हा दुर्दम्य आशावाद घेऊन तुम्ही चिमुकली पाखर शाळेत किलबिलणार आहात..तुमच हसणं, फुलण, बहरण,माणूस म्हणून घडण हे सार सार शाळा अभिमानान आपल्या अंगाखांद्यावर पेलणार आहे.. नव्या विश्वासाने,नव्या प्रेरणेने एकत्र येऊ पण सामाजिक अंतराच भान निश्चित ठेऊ. *मास्क,सॅनिटायझर,O2 लेव्हल तपासणे, तापमान तपासणे, सामाजिक अंतर ठेवणे ह्या दररोजच्या नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आमच्यासह पेलायच्या आहेत, ते आपण निश्चित पेलूया..नवीन आव्हानासह पाखरानी शाळा पुन्हा गजबजणार..10 महिन्याची प्रतिक्षा संपणार.भेटूच...27 जानेवारीला ........ *पाखरांनो शाळा तुमची वाट पाहतेय.*.You are always wel come dear students..
🙏🙏🙏🙏🙏🙏
बळवंत राठोड
Comments
Post a Comment