Monday, 19 December 2022

संत गाडगेबाबा

 स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी वाचनीय माहिती




*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          

             चंद्रपूर 9403183828                                                      

➿➿➿➿➿➿➿➿➿

💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥


            *स्वच्छतेचे पुजारी*  

          *संत गाडगे महाराज*


  *डेबूजी झिंगराजी जानोरकर*

             (समाज सुधारक)


     *जन्म : 23 फेब्रुवारी 1876*

 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)


    *निधन : 20 डिसेंबर 1956* 

                (वय 80)

  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )


मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    

                      नीतिशास्त्र

प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा

                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

 

👬 *गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट*

                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

📚 *गाडगे महाराजांची चरित्रे*

  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)

गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)

गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)

श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)

Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)

गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)

गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)

निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)

लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)

The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)

संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)

संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)

संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)

संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)

श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)

श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)

संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)

समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )

स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

🎥 *गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट*

                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर

देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त


📖 *साहित्य संमेलन*

               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.


⏳ *मृत्यू*

                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 


🏵 *सन्मान* 

                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

🏵 *सन्मान*

            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.


 🙏🌹 *गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला...* 🌹🙏

        


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         ♾♾♾ *167* ♾♾♾

           स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹

📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*

*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

■■■■■■■■■■■■■■■■■


Tuesday, 13 December 2022

जगदीश चंद्र बसू

 जगदीश चंद्र बसू 



*सजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा शास्त्रज्ञ - जगदीशचंद्र बसू*


पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं". तर ते  भारतीय शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू व ते दिग्गज शरिरशास्त्रज्ञ होते डाॅ.वाॅलर.


      जगदीशचंद्र बसूंचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी  मैमनसिंग जवळ राणिखल (अत्ताच्या ढाक्या जवळ) झाला. वडील भगवान चंद्र हे ब्रिटिशांच्या सेवेत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वडील गेल्यानंतर जगदीशचंद्र बसूंचे आर्थिकदृष्ट्या खूप हाल झाले. वडिलांनी घेतलेले सर्व कर्ज एक एक करत बसूंनी फेडले. १८७५ मध्ये मॅट्रिक पास होऊन त्यांनी कलकत्त्याच्या(अत्ताचे कोलकाता) सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. १८८५ साली कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी महाविद्यालयात त्यांची भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. इतर प्राध्यापकांपेक्षा(ब्रिटिश) त्यांना कमी वेतन दिले गेले होते. म्हणून त्यांनी ते वेतन न घेताच अध्यापन करत राहण्याचा निर्णय घेतला. या सत्याग्रहाला तीन वर्षानंतर यश आले. तीन वर्षाच्या वेतनाच्या फरकातून आलेल्या पैशातून शेवटी त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले पितृकर्ज फेडले होते. 

       ब्रिटिश प्राध्यापकांनी पहिल्यापासूनच जगदीशचंद्रांवर एक डुख धरलेला होता. बसूंना सुरुवातीला प्रकाशचित्रणकला  (फोटोग्राफी)व विद्युत चुंबकीय लहरी(इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज्) या क्षेत्रात संशोधन करण्यात रस होता. ब्रिटिश प्राध्यापकांना वाटत की हे संशोधन करणे वगैरे ते तुमचे (भारतीयांचे) काम नाही. मॅक्सवेलने गणिती पद्धतीने विद्युत चुंबकीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले होते. प्रा.लाॅज यांनी काम केलेल्या विद्युत चुंबकीय लहरींची तरंगलांबी(वेव्हलेंग्थ) ही सेंटीमीटर मध्ये होती तर हर्ट्झ यांनी काम केलेल्या विद्युत् चुंबकीय लहरींची तरंगलांबी ही डेसीमीटर या एककात होती. म्हणजे तशा अर्थाने ही सर्व एकके मोठीच होती. बसूंनी मात्र त्याही पेक्षा कमी म्हणजे मिलिमीटर या एककातील तरंगलांबी वर काम केले होते. आज आपण बिनतारी संदेश यंत्रणेचा जनक म्हणून मार्कोनी चे नाव घेतो पण, त्याआधीही बिनतारी संदेशाचे जनकत्व जगदीशचंद्र बसुंकडे जाते. बसूंचे केंब्रिज मधील गुरु लॉर्ड रेले यांनी विद्युत चुंबकीय लहरी बाबतचे हे संशोधन लगेच रॉयल सोसायटी तर्फे प्रकाशित केले.

      त्यानंतर बंसूंनी थोड्याच कालावधीत 'आॅन दी जनरल मॉलिक्युलर फेनाॅमिना प्रोड्यूस्ड बाय इलेक्ट्रिसिटी इन लिविंग अँड नाॅनलिविंग मॅटर' या नावाच्या निबंधात त्यांनी प्रतिपादन केली होती की विद्युत प्रारणांमुळे आयन ऑक्साईडचा (Fe2O3) प्रतिसाद कसा बदलतो हे प्रयोगाने दाखवून दिले. त्याचा आलेख व स्नायुंनी उत्तेजनेला दिलेली प्रतिसादाची आलेख खुप साधर्म्य दाखवतो. बसूंनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधले ते म्हणजे जिवंत पेशी विष, रसायने,औषधांची कमी-अधिक मात्रा यांना जसा प्रतिसाद देतात तशाच प्रकारचा प्रतिसाद वनस्पतीही व धातूही देतात. म्हणजे भौतिक आणि जैविक घटना या एकाच प्रकारच्या आहेत हा निष्कर्ष यातून निघतो. ही गोष्ट पॅरिसमध्ये पदार्थवैज्ञानिकांच्या ज्या आंतरराष्ट्रीय परिषदेत घडली त्या परिषदेत भारतातून विवेकानंद ही उपस्थित होते. विवेकानंदांना हे सजीव निर्जीवातले हे अद्वैत निश्चित भावले असणार यात काही शंकाच नाही. विवेकानंदांना बसूं बाबत त्यांची शिष्या भगिनी निवेदिता कडून कळाले होते.भगिनी निवेदिता ना बसूंच्या संशोधनात रस असण्याचं एक कारण त्या स्वतः पदार्थ विज्ञानात पदवीधर होत्या हे असू शकते.

        बसूंनी आपले हे संशोधन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलं होतं. त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं.  उपकरणांची उपलब्धता नव्हती. असणार तरी कशी ? त्यांनी संशोधनासाठी क्षेत्र नवीन निवडले होते. त्यांना गरजेची उपकरणे स्वतःची स्वतः तयार करावी लागत. सव्वाशे वर्षांपूर्वी विज्ञानातील वेगवेगळ्या शाखांमध्ये अलिखित विभाजन होते जणू.  भौतीकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी जीवशास्त्रात काय चाललय हे पहायचे नाही की जीवशास्त्राच्या लोकांनी रसायनशास्त्रात! या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये जे दुभाजक होते ते तोडण्याचा सफल प्रयत्न जगदीशचंद्रांनी केला होता.


     एक प्रसिद्ध शरीररचना शास्त्रज्ञ डॉ.वाॅलर व जगदीशचंद्रांची भेट एका परिषदेच्या व्याख्याना निमित्त झाली. वाॅलर यांचे मत प्रारंभी बसूंच्या च्या विरोधात होते. परिषदेतील बसूंचे व्याख्यान ऐकल्यावर मात्र वाॅलर यांचे मत बदलले. बसूंच्या संशोधनामुळे वाॅलर यांचे संशोधन पूर्णपणे उलटे पालटे झालं होतं. सजीव व निर्जीव यांच्यामध्ये येतात त्या वनस्पती या औषधे, विद्युत, विष, पाणी, स्पर्श यांना प्रतिसाद (रिस्पॉन्स)कसा देतात हा प्रश्न बसूंना पडायला लागला. त्यादृष्टीने बसूंनी संशोधनाची हालचाल करायला सुरुवात केली.  त्यांनी भाज्या,फळभाज्या यावर वरील गोष्टींचे प्रयोग केले. काही रसायनांमुळे त्या भाज्या उत्तेजित झाल्या तर विषामुळे त्या बधीर झाल्या. इंग्लंडमध्ये असताना एका प्रसिद्ध शरीररचना शास्त्रज्ञ मायकेल फाॅस्टर बसूंच्या प्रयोग शाळेत आले. बसूनी त्यांच्या हातात एक आलेख असलेला कागद दिला व म्हणाले की, "हा कसला आलेख आहे  सांगाल का ?" फाॅस्टर म्हणाले, "कित्ती सोप्प आहे,पन्नास वर्षे हेच पाहतोय मी, स्नायूंच्या प्रतिसादाचा आलेख आहे हा!" बसू  मिश्किल हसत व त्यांच्याकडे पाहत म्हणाले की,"हा कथिलाने दिलेला प्रतिसाद आहे!" हे ऐकून फाॅस्टर खुर्चीतून उडालेच होते.


  'द रिस्पॉन्स ऑफ इनआॅर्ग्यानिक मॅटर टू मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल्स स्टिमुलस' या व्याख्यानात त्यांनी रसायन,भौतिक व जैविक विद्याशाखांमधील अंतर कमी करण्याचे काम त्यांनी  केले.अगोदर प्रचलित असलेल्या सजीव निर्जीव यांच्या व्याख्या त्यांनी अक्षरशः मोडीत काढल्या. विषामुळे धातूवर होणारे गंभीर परिणाम आणि विषावर उतारा दिल्यामुळे  विष कसं उतरतं हे ही दाखवलं. या व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी स्वतः तयार केलेलं एक उपकरण दाखवलं त्याला ते 'कृत्रिम डोळा' असे म्हणतात मानवी डोळ्यांना न दिसणारी काही अदृष्य किरण या उपकरणाच्या सहाय्याने दिसू शकतात. त्यांनी हे असं सांगितल्यावर तर सर्व सभागृहात आश्चर्याने थक्क झाले होते.  पूर्वीचा सजीव-निर्जीव याच्या व्याख्या होती 'जे प्रतिसाद देतात ते सजीव व जे प्रतिसाद देत नाही ते निर्जीव'. या प्रचलित व्याख्या, त्यांनी एक कथिलाची तार घेतली व तिला पिळ.पिळ  देणे ही सुद्धा एक उत्तेजनाच आहे. त्या उत्तेजनेमुळेच धातूच्या  विद्युत प्रतिसाद बदललेला त्यांनी सर्वांना दाखवला. या प्रयोगानंतर ते म्हणाले,"एका असेंद्रिय पदार्थाने दिलेल्या प्रतिसादाचं व सजीवांनी दिलेल्या प्रतिसादाचं किती विलक्षण साम्य आहे पहा!" त्यानंतर बसूंनी दोन आलेख सर्वांना दाखवले ज्यात एक होता कथिलाला आलेला थकव्याचा व  एक आलेख होता मानवी स्नायूंना आलेला थकव्याचा. दोन्ही आलेखात विलक्षण साम्य होते.


     वर उल्लेखलेला कृत्रिम डोळ्यावर त्यांनी विद्युत चुंबकीय लहरींना प्रक्षेपित केले व त्याच्या प्रतिसादाचा आलेख दाखवला.  त्याच विद्युत चुंबकीय लहरींना परत त्यांनी बेडकाच्या डोळ्यावर प्रक्षेपित केल्यावर दिलेला प्रतिसाद यामध्ये बरेच साम्य आढळले (शेजारील आकृती पहावी).सजीव पेशी विषारी रसायनांमुळे जशा मृतपाय होतात व त्यांचा विद्युत प्रतिसाद शून्यवत होतो. तसचं सोडियम कार्बोनेट किंवा कॉस्टिक पोटॅश मुळे कथिलाचेही तसंच होतं हे बसुंनी दाखवून दिले. म्हणजे समोर बसलेला प्रत्येक जण आपल्या डोळ्यांची एका 'निर्जीव'  पदार्थाचा 'मृत्यू' अनुभवत होते. यानंतर बसूंनी एक मोठा धक्का दिला जर वेळेवर उतारा दिला तर सजीव पेशी जशी पूर्ववत होते अगदी तसंच त्यांनी धातूच्या बाबतही करून दाखवले. व्याख्यानातून समारोप करताना बसू म्हणतात की, "अशा वेळी अशी एखादी विभाजक रेषा कुठून काढणार की  जिच्या अलीकडे भौतिक प्रक्रिया आहेत आणि पलीकडे जैविक? खरंतर अशा काही विभाजन रेषा अस्तित्वातच नाहीये".

     मग अाता प्रश्न असा उपस्थित होतो की जगदीशचंद्र बसूंच्या प्रयोगांना कुणीच आव्हान दिले नाही का? तर तसं अजिबात नाही. वर डाॅ.वाॅलर यांचा उल्लेख आलेलाच आहे. सर जाॅन बर्डन सँडरसन हे शरीरशास्त्रातलं त्यावेळेसचं एक 'दादा' नाव होतं. बसूंच्या वनस्पतींच्या विद्युत् प्रतिसादाबद्दलच्या मांडणीला त्यांनी तीव्र आक्षेप घेत म्हणाले की,"माझी उभी हयात वनस्पतींचा प्रतीसाद मिळवण्यात गेली आहे. फक्त लाजाळूच  तेवढा प्रतिसाद देते; त्यामुळे तुम्ही जे सांगत आहात ते सर्व अशक्य आहे. हा असा जोरदार हल्ला जेव्हा एका दादा शास्त्रज्ञाने केल्यावर कुणीही गर्भगळीत झाले असते.पण बसू मात्र त्याच्या 'दादापणाला' घाबरले नाही. न घाबरता उत्तर देण्यासाठी उभे राहत ते म्हणाले की," तुमचा अाक्षेप हा माझ्या प्रयोग सिद्ध गोष्टींवर नाहीये. प्रयोग सिद्ध गोष्टींवर अाक्षेप हा प्रयोग सिद्ध पुराव्याने घ्यायचा असतो.जर तो 'अधिकाराच्‍या' आधारे घेतला जाणार असेल तर मी त्यापुढे नमणार नाही" बापरे! सँडरसन यांना असे उघड आव्हान? परंतु सँडरसन यांनी ना कोणता पुरावा दिला ना ते बसूंचे म्हणणे खोडून काढू शकले. उलट सँडरसन यांनी रॉयल सोसायटी मध्ये आपले वजन खर्च करून जगदीश बाबूंची निबंध छापून कसे येणार नाहीत यासाठी प्रयत्न केले. पुढे यथावकाश सँडरसन यांच्या दुराभिमानाचे ढग निवळले बसूंचे संशोधन,प्रयोग रॉयल सोसायटीने मान्य केले.


    विज्ञान हे द्वैत वादाकडून अद्वैतवादाकडे जात आहे हे पुंज भौतिकशास्त्रावारुन लक्षात येते. जगाला e =mc2 या आईन् ष्टाईनच्या समिकरणाने द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा पहिला दणका दिला हे जरी खरं असलं तरी आईन् ष्टाईनच्याही आधी सजीव व निर्जीव यांच्यातले प्रयोग सिद्ध अद्वैत मांडणारे होते फक्त जगदीशचंद्र बसूच!


अजिंक्य कुलकर्णी


===≠=============



Thursday, 20 October 2022

APJ अब्दुल कलाम माहिती

 APJ अब्दुल कलाम निबंध व भाषण साठी उपयुक्त माहिती









*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
              चंद्रपूर 9403183828                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡
                 *भारतरत्न*
*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*
                       तथा  
            *ए. पी. जे. अब्दुल कलाम*
(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       *जन्म : १५ ऑक्टोबर १९३१*
                *(रामेश्वर)*
       *मृत्यू : २७ जुलै २०१५*
                *(शिलाँग)*
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 *कार्य* 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 *शिक्षण*
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ *स्वभाव* 
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 *गौरव*
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 *निधन*
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  *जयहिंद*  🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷
            ♾♾♾346♾♾♾
           संदर्भ - Wikipedia                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲


■■■■■■■■■♂■■■■■■■■■■

********************************
*@ १५ ऑक्टोबर @*
*वाचन प्रेरणा दिन*
********************************

आज वाचन प्रेरणा दिन !

१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.

आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते.

वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.

वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात.

एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य.

नुसता एकच दिवस 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करुन थांबण्यापेक्षा, रोजच जर पुढील उपक्रमांद्वारे वाचन प्रेरणा राबविली तर वाचन प्रेरणा दिनाचे रुपांतरण वाचन चळवळीत होईल, यांत शंका नाही. या साठी केवळ शाळेतच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, घर परिसर, घर या पातळ्यांवर वाचनालय, पुस्तक पेढी, पुस्तक भेट योजना, पुस्तक दान योजना, वाचन प्रेरणा विषयक व्याख्याने यांचे वेळोवेळी वा कायमचे आयोजन/नियोजन आवश्यक आहे.

या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी!

आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्रमैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

आता समारोप चारोळीने करुया !

*वाचाल तरच वाचाल !*

'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !

प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, संवेदनशील, रसिक व कलावंत होण्यासाठी प्रत्येक शाळेने वाचन प्रेरणेचे कार्यक्रम घेऊन येणारी पिढी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची घडवावी हेच 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करतांना अपेक्षित आहे. पुस्तकी वाचनासोबत आपण एखाद्याच्या 'मनाचे' ही वाचन करावे ही सर्वांना नम्र विनंती करुन, आम्ही आपला निरोप घेतो.

*© अनिल जाधव, शिरपूरकर*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************



Saturday, 1 October 2022

लाल बहादूर शास्त्री

 लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी निबंध व भाषण यासाठी उपयुक्त माहिती








*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🙋🏻‍♂️📝🇮🇳👨‍🦰🇮🇳📚🙋🏻‍♂️⚜️
          
           *लालबहादूर शास्त्री*
        (भारताचे दुसरे पंतप्रधान)

*जन्म : २ ऑक्टोबर १९०४*
(मुगलसराई, भारत)
*मृत्यू : ११ जानेवारी १९६६*
(ताश्कंद)
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी : ललिता देवी
धर्म : हिंदू                                                           लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.
*दुसरे भारतीय पंतप्रधान कार्यकाळ*
जून ९, इ.स. १९६४ – जानेवारी १२ इ.स. १९६६
मागील : गुलजारी लाल नंदा
पुढील : गुलजारी लाल नंदा
*तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*
जून ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
मागील : गुलजारी लाल नंदा
पुढील : सरदार स्वर्णसिंग
💁‍♂️ *जीवन*
       २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.
               वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
           नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
🪔 *मृत्यूविषयी संशय*
      शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणती दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.
📚 *लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके*
                गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
🏬 *लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था*
                      लालबहादुर शास्त्री झोपडपट्टी नं १, २, ३ : मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी
लालबहादुर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड -मुंबई) : जुने नाव - (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड
लालबहादुर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टाॅकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.
लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र आभिवादन* 🌹🙏

        ♾♾♾ *90* ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                        ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲



Tuesday, 27 September 2022

शहीदे आझम भगतसिंग

 शहीदे आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन







*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥

       *शहिदे आझम भगतसिंग* 

     *जन्म :  28 सप्टेंबर 1907*
      *(ल्यालपूर, पंजाब, भारत)*
       *फाशी : 23 मार्च 1931*
*(लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)*

*टोपणनाव : भागनवाला*
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा,
            कीर्ती किसान पार्टी,
            हिंदुस्तान सोशालिस्ट     
            रिपब्लिकन असोसिएशन
पत्रकारिता/ लेखन: अकाली, 
              अनुवाद, 'मेरा आयरिश     
               स्वतंत्रता संग्राम'
धर्म: नास्तिक
प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट
प्रभावित: चंद्रशेखर आझाद
वडील: सरदार किशनसिंग संधू
आई: विद्यावती

            भगतसिंग  एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.
                  डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्यांचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे ते दोन आठवड्यांनंतर मरण पावले. 
                  त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.

♦ *भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन-*
            भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.
           त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. 
                बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला.
        ईटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग ईटाली' नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन भगतसिंगने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापित केली. तो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्याने लिहीले 'माझ जिवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केलय, जे की  देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही'.

♦ *भगतसिंगांचे व्यासंग*
                   भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

♦ *वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते-*
        भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.

♦ *स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य-*
            ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
                        भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले  आरोपपत्र हॊय.

♦ *आरोपपत्र -*
                    "वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
                 हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :-

१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे.

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.

६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.

              सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.

♦ *भगतसिंगांचे विचार -*
                   बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
             समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
                    समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
           हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: 
*'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,* 
*सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'*

          भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते. ते म्हणत "जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है!"

♦ *शहीद भगतसिंग आणि गांधीजी -*
                     भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. 
         महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
                कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."
                भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

♦ *भगतसिंगांचे नास्तिकत्व-*
             ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
                   भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.
          संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.
       या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.
            शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.
            या निबंधामुळे भगतसिंग  नास्तिक आहे कि नाही हा वाद बंद झाला. 

♦ *'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग (वय २३ वर्षे)*
                "त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.
          'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? 
                एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
           जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.

♦ *संग्रहालय -*
                     अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.

♦ *दफनभूमीवरील स्मारक -*
                      भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता.भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

♦ *पुस्तके-*
          भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही निवडक पुस्तके :-

आम्ही कशासाठी लढत आहोत? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)
मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)
विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)
शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)
सरदार भगतसिंग (संजय नहार)
मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
  🇮🇳 *इन्कलाब जिंदाबाद*  🇮🇳
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

    🙏 *विनम्र अभिवादन*🙏

    ♾♾♾♾♾*30*♾♾♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                         ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲




Friday, 16 September 2022

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 






भाग 1

हैद्राबादची निजामशाही                  
       
       17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 
         निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा  सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम  मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 
           15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता.  
             22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती.  त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. 
        हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे  जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 
        1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 
        1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 
          1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
       राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. 
        मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 
        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
                                                                                                                               प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४


भाग 2


मराठवाडा मुक्तीदिन..एक संघर्ष गाथा..(17 सप्टेंबर  मराठवाडा मुक्ती दिन विशेष)
***👏👏👏👏👏*
आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रज्जासत्ताक दिन.भारतीय ईतिहासात या दोन सणाला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व मराठवाड्यातील जनतेसाठी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस (17 सप्टेंबर 1948) या दिवसाला आहे. कारण हा दिवस तमाम मराठवाड्यातील जनतेसाठी सोनेरे दिवस आहे आहे असे मनायला हरकत नाही..कारण याच दिवशी एक कोटी विस लाख जनता निजामाच्या जुल्मातुन मुक्त झाली.. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला, तेलंगना ,उत्तर कर्नाटक व विदर्भ हे भाग हैद्राबाद संस्थानात सन 1724 पासुन होते.परंतु हैद्राबाद चा निजाम स्वतःला अमिरो मोमीन (तमाम मुस्लीमांचा अमीर)समजनारा मीर उस्मान अली याला हे मान्य नव्हते ...सर्व प्रजा आपली गुलाम बणून राहावी.आपणच यांचे बादेशहा व्हावे असे याला वाटे.परंतु मराडवाड्याचे भाग्यविधाते स्वामी रामानंद तिर्थ यांना आपला मराठवाडा मुक्त झाला पाहिजे असे वाटे.कारण निजामाची गुलामगीरी मराठवाड्यातील जनतेला अन्यायकारक वाटे,,बघता बघता स्वामींच्या नेतृत्वाखाली मुक्तीचा वनवा पेटला.
सर्व नेत्यांना वाटे आपण स्वतंत्र झालो की ,आपला विकास होईल यात गोविंदभाई श्राफ ,गोविंदराव पानसरे,भाई शामल ,नवसाजी नाईक,श्रीधर वर्तक,बह्रजी शिंदे ,शोएबअल्ली खां,हुतात्मा जयवंतराव पाटील.या स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढाईत सहभागी होऊन हा लढा यशस्वी करुन दाखवला,,1948 मध्ये तत्कालीन केंद्रीय ग्रहमंञी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्य काळात मराठवाडा हैद्राबाद संस्थानामधुन वेगळा झाला.
सामाजिक स्थिती ,,,,,
----------------------
निजामकालिन सामाजिक ,धार्मिक ,राजकीय स्थिती अतिशय भयानक होती,,,राजा बोले दल हले या उक्ती प्रमाणे वागावे लागे,,स्ञीयांना सामाजिक ,धार्मिक कार्य क्रमात अजिबात स्थान नव्हते .परंतु मराठवाडामुक्तीदिनापासुन आज पर्यत आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत.पण ख-या अर्थाने आपण मुक्त झालो का? त्या काळापासून आज या काळापर्यत विकासाची गंगा महाराष्ट्रातील मराठवाड्यात आली का?याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. मराठवाडा मुक्त झाला तर मराठवाड्याचा विकास होईल असे नेत्यांना वाटे.
त्या काळात हैद्राबाद संस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदुवर अत्याचार होत होते. आर्य समाज व हिंदु महासभा या दोन सामाजिक संघटनांनी हे अत्याचार हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला.1937 च्या फेब्रुवारीत गुंजोटीच्या दासप्पा शिवदास हर्के या तरुणाने रझाकारांना विरोध करत आपले प्राण आर्पन केले.रजाकारचा पुढारी कासिम रिजवी हा मोठा जुल्मी होता,,समाजावर अन्याय करणे हा त्याचा धर्मच होता..
16 मार्च 1948 रोजी हदगाव तालुक्यातील कोळी या गावी साहेबराव बारडकरांच्या नेतृत्वाखाली रझाकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यात तुफान झडप झाली यात पंचावन्न रझाकार मारले गेले.29 जुलै 1948 रोजी कंधार तालुक्यातीला कल्हाळी या गावी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस रझाकारांना ठार मारण्यात आले.तर छत्तीस कल्हाळीकरांना हौतात्य पत्करले.उदेश हाच की मराठवाड्यातील जनतेला माणुस म्हणून जगता आले पाहिजे .
राजकीय संघर्ष .....
कोणतेही आंदोलन यशस्वी करण्यासाठी साम,दाम लागतो , म्हणून आंदोलन यशस्वी करण्यासाठी पैशाची गरज भासु लागली . तेव्हा आंदोलकांनी विचार केला की आपल्याला पैशाची गरज आहे आणि निजामाला तर नामोहरण करायचे ,तेव्हा निजामाची सरकारी ब्यांक लुटली तर निजामाला अद्दल घडेल म्हणून 30 जानेवारी 1948 रोजी उमरी येथील ब्यांक आंदोलन कर्त्यांनी लुटुन जवळजवळ विस लाख सत्तर हजार रुपये लुटुन त्यातुन शस्ञास्ञ खरेदी करुन आंदोलन यशस्वी केले,या आंदोलनाला सर्व समाजातील व्यक्ती .विद्यार्थी सहभागी झाले होते.त्याच प्रमाणे 1938मध्ये औरंगाबाद च्या शासकीय महाविद्यालयात गोविंदभाई श्राफ यांच्या नेतृत्वाखाली 1200 ते 1300 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत म्हणण्याचा आग्रह धरला व झेंडा सत्याग्रह केला..हैद्राबाद किल्यावरचा असफजाही वंशाच्या धर्मांध सत्तेचे प्रतीक असणारा पिवळा ध्वज खाली उतरवून स्वतंत्र भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकू लागला..
सद्यस्थिती......
आज आपण मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो.पण खरोखरच मराठवाड्यातील जनता मुक्त झाली का? मराठवाड्याचा विकास झाला का? विकासाच्या बाबतीत ईतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा फारच मागे आहे.याला कारण राजकीय अनास्था आहे.
एकदा का आमदार ,खासदार निवडून आले की पुढच्या पाच वर्षीच तोंड दाखवतात, रस्ते ,पिण्याचे पाणी आणि शिक्षणक्षेञात आजही आपण मागे आहोत.मराठवाड्यातील ईतर जिल्ह्याच्या तीलनेत बीड जिल्हा फारच मागे आहे. उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंचन आणि शिक्षण कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही,पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पुरेशी शेती पीकत नाही त्यामुळे आत्महत्या चे प्रमाण आहे.जिल्ह्यात म्हणावे तसे उद्योग धंदे नाहीत.नांदेड जिल्ह्यात किनवट ,माहुर आजही आदिवासी भाग आहे आज पर्यत या भागाचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही,.एकविसाव्या शतकाकडे जात असताना प्रत्येकालाच आपण मागास आहोत असे वाटत आहे. आमदार ,खासदारांना तहहयात पेन्शन आहे, शिकल्या सवरल्या नविन गुरुजींना पेंन्शन नाही हीच शोकांतीका आहे.पाच सहा वर्षापासुन नोकरभरती नाही .मग वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी वाढणार नाही हे कशावरु ? गावागातील  धार्मिक तेच्या बाबतीत लाखो ची लोकवर्गणी जमा होते .गावच्या गाव पक्ती उठतात..पण शाळेच्या विकासासाठी कधी एकञ येताना दिसत नाहित (अपवादात्मक)निवडणूकीत पैसे वाटप केले जातात  पण विधायक कामासठी हात आकडता घेतात.?विकासाची दुरदृष्टी समोर ठेऊन अंतर्गत हेवेदावे बाजुला सारुन विकासासाठी राजकारणी एकञ आले तरच आपल्या मराठवाड्याचा विकास होईल. ग्राम पंचायत स्थरावर लाखो रुपये येतात तरीही..गावात पाणी ,रस्ते निट नाहीत..स्वातंत्र्याचा पंच्याहतरावा अमृत महोत्सव साजरा आपण सर्वांनी साजरा केला याचा आपणा सर्वांना अभिमान आहे..परंतु  पंच्याहत्तर वर्षातही गोर गरिबांना घरे ,रस्ते ,आरोग्य सुविधा मिळु नये..ही शोकांतीका नाही का.,रस्या अभावी नागपूर ,मुंबई सारख्या काही भागात बाळंतीन बाईचा मृत्यू  होतो...पाण्यासाठी लहान मुलांची शाळा बुडते...बस आभावी मुले मुली शाळेत जात नाहीत.आजही मुलींचा उपस्थिती भत्ता प्रतीदिन एक रुपया आहे...शाळेला दोन वर्षापासून अनुदान नाही..शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही,, जेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव..प्रत्येक जिल्हात वैद्यकीय महाविद्यालये ,तंञ महाविद्यालये .रस्ते जोडणी,ईंटरनेट जाळे .प्रत्येक शाळा दिल्ली सरकारच्या धर्तीवरची सर्व शाळांना अनुदान..शिक्षण सेवक ही संकल्पना रद्द करुन पुर्णतः शिक्षक दर्जा,.पेंन्शन योजना चालू.,ग्रामपातळी सर्व योजनांची माहिती आणि काटेकोर अंमलबजावणी ..राजकीय नेत्यांना उच्च शिक्षणाची अट.एकदाच निवडणूक लढवता यावी असे धोरण.अश्या योजनांनी प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी...राजकीय नेते सत्तेसाठी आपली पोळी भाजून घेतआहेत .. जर असेच आवो भाई बांधो भारा.आधा तुम्हारा आधा मेरा असे जर होत राहिले तर त्या स्वातंत्र्य सैनिकांना काय वाटत असेल.केवळ स्मृतीस्तंभावर जाऊन आदरांजली वाहिली की झाले असे न होता
त्यांच्या प्राणाची आहुती आठवण करुन विधायक कामे करण्याचा संकल्प करुया..,मुक्तीचा आक्रोश आमुचा स्वातंत्र्य आम्हा पाहिजे ...ध्यास एक श्वास एक एकता आम्हा पाहिजे.,अश्या ध्येयवेडे होऊन मराठवाडा मुक्तीलढ्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी व विरांगनांना विनंम्र अभिवादन
👏👏👏👏
.,प्रा.शेख युसूफ मौलासाब आंबुलगेकर (राज्य  निष्ठा  तज्ज्ञ )
9049786295 
 





-------

*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️💥🔫🇮🇳👨🏻🇮🇳🔫💥⚜️

                   *१७ सप्टेंबर*
       *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*

*आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –*

         मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हिंगोली
 
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी–*
   *'स्वप्ने पडली उष:काळाची*
        *हाती मात्र अंध:कार*
     *देश सारा उजळला जरी* 
   *मराठवाड्याची काजळ रात'*

           दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबादव संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला
 मराठवाडा पारतंत्र्यात होता. 
स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा
 प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल? हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.

*'रण  पेटले पेटले रण*
           *अग्निज्वाला सर्वदूर* 
*अंगार मनामनात* 
                *झुगारु हा अंकुश'*

जनमताचा प्रक्षोभ उसळला. खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.
    १९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात 
पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, 
किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या. आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली. निजाम सरकारविरुद्ध आपला रोष  व्यक्त केला.

*'मुक्तीचा आक्रोश आमुचा*
        *स्वातंत्र्य आम्हा पाहिजे* 
*ध्यास एक श्वास एक* 
        *हेच आमुचे ध्येय असे'*

भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार यासगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८  रोजी भारत सरकारने
 हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली. इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा
 इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. १७ सप्टेंबर १९४८ ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने 
त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात 
मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.
       आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती.
 17 सप्टेंबर 1948
 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....! 

*डॉ.आंबेडकर जी की भूमिका-*
 मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ 
निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार, दो पाटों के बीच पिसा
 जा रहा था. निजाम मीर उस्मान
अली खान ने डॉ. बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था. यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी. डाॕ.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है. रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा
 २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें. यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम 
रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुस-या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु 
झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, 
गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, 
बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची 
पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर
पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे 
काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,
 नांदेड येथील देवरावजी 
कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या
 कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम
 तेजस्वीपणे लढला गेला .
            या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल
 काढणं शक्य नाही.
              निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडूनआलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि
खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
 
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन  १७ सप्टेंबर रोजी तब्बल ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ७० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
       या संग्रामाच्या उज्ज्वल आणि 
लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या 
मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार
 होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण 
असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश
 स्वतंत्र झाला तरी हैदराबाद 
संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. 

निजामाचा धूर्त डाव होता की,
 १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून 
घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी
 संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद
 सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे 
हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. 
घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला.
 निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला *‘पोलीस ऍक्शन’* असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....!

*मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण*

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी 
संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये
 विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र 
भारतात सामील होण्याची सहमती 
दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त 
होऊन भारतीय संघराज्यात 
सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती
 संग्राम सुरु झाला होता. 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम रझवी 
याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
        मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल 
उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, 
मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या 
बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने
 मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, 
शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.
 या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 
1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. 
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली 
आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला.हैदराबाद संस्थानात 
तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा  लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
  
   *"समोर होता एकच तारा* 
       *अन पायतळी अंगार !"*

  *अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी, वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....!* 🙏🙏

       🇮🇳 *जयहींद*  🇮🇳
   
           ♾♾♾ *84* ♾♾♾
स्त्रोत ~ bmcschoos.blogspot.in                                                                                                                                                                                                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲


स्वामी विवेकानंद

 युवा दिन स्वामी विवेकानंद *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿        🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳                  ▬ ❚❂❚❂❚ ▬   ...