मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 






भाग 1

हैद्राबादची निजामशाही                  
       
       17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 
         निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा  सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम  मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 
           15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता.  
             22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती.  त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. 
        हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे  जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 
        1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 
        1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 
          1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
       राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. 
        मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 
        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
                                                                                                                               प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४


भाग 2


मराठवाडा मुक्तीदिन..एक संघर्ष गाथा..(17 सप्टेंबर  मराठवाडा मुक्ती दिन विशेष)
***👏👏👏👏👏*
आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रज्जासत्ताक दिन.भारतीय ईतिहासात या दोन सणाला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व मराठवाड्यातील जनतेसाठी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस (17 सप्टेंबर 1948) या दिवसाला आहे. कारण हा दिवस तमाम मराठवाड्यातील जनतेसाठी सोनेरे दिवस आहे आहे असे मनायला हरकत नाही..कारण याच दिवशी एक कोटी विस लाख जनता निजामाच्या जुल्मातुन मुक्त झाली.. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला, तेलंगना ,उत्तर कर्नाटक व विदर्भ हे भाग हैद्राबाद संस्थानात सन 1724 पासुन होते.परंतु हैद्राबाद चा निजाम स्वतःला अमिरो मोमीन (तमाम मुस्लीमांचा अमीर)समजनारा मीर उस्मान अली याला हे मान्य नव्हते ...सर्व प्रजा आपली गुलाम बणून राहावी.आपणच यांचे बादेशहा व्हावे असे याला वाटे.परंतु मराडवाड्याचे भाग्यविधाते स्वामी रामानंद तिर्थ यांना आपला मराठवाडा मुक्त झाला पाहिजे असे वाटे.कारण निजामाची गुलामगीरी मराठवाड्यातील जनतेला अन्यायकारक वाटे,,बघता बघता स्वामींच्या नेतृत्वाखाली मुक्तीचा वनवा पेटला.
सर्व नेत्यांना वाटे आपण स्वतंत्र झालो की ,आपला विकास होईल यात गोविंदभाई श्राफ ,गोविंदराव पानसरे,भाई शामल ,नवसाजी नाईक,श्रीधर वर्तक,बह्रजी शिंदे ,शोएबअल्ली खां,हुतात्मा जयवंतराव पाटील.या स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढाईत सहभागी होऊन हा लढा यशस्वी करुन दाखवला,,1948 मध्ये तत्कालीन केंद्रीय ग्रहमंञी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्य काळात मराठवाडा हैद्राबाद संस्थानामधुन वेगळा झाला.
सामाजिक स्थिती ,,,,,
----------------------
निजामकालिन सामाजिक ,धार्मिक ,राजकीय स्थिती अतिशय भयानक होती,,,राजा बोले दल हले या उक्ती प्रमाणे वागावे लागे,,स्ञीयांना सामाजिक ,धार्मिक कार्य क्रमात अजिबात स्थान नव्हते .परंतु मराठवाडामुक्तीदिनापासुन आज पर्यत आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत.पण ख-या अर्थाने आपण मुक्त झालो का? त्या काळापासून आज या काळापर्यत विकासाची गंगा महाराष्ट्रातील मराठवाड्यात आली का?याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. मराठवाडा मुक्त झाला तर मराठवाड्याचा विकास होईल असे नेत्यांना वाटे.
त्या काळात हैद्राबाद संस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदुवर अत्याचार होत होते. आर्य समाज व हिंदु महासभा या दोन सामाजिक संघटनांनी हे अत्याचार हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला.1937 च्या फेब्रुवारीत गुंजोटीच्या दासप्पा शिवदास हर्के या तरुणाने रझाकारांना विरोध करत आपले प्राण आर्पन केले.रजाकारचा पुढारी कासिम रिजवी हा मोठा जुल्मी होता,,समाजावर अन्याय करणे हा त्याचा धर्मच होता..
16 मार्च 1948 रोजी हदगाव तालुक्यातील कोळी या गावी साहेबराव बारडकरांच्या नेतृत्वाखाली रझाकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यात तुफान झडप झाली यात पंचावन्न रझाकार मारले गेले.29 जुलै 1948 रोजी कंधार तालुक्यातीला कल्हाळी या गावी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस रझाकारांना ठार मारण्यात आले.तर छत्तीस कल्हाळीकरांना हौतात्य पत्करले.उदेश हाच की मराठवाड्यातील जनतेला माणुस म्हणून जगता आले पाहिजे .
राजकीय संघर्ष .....
कोणतेही आंदोलन यशस्वी करण्यासाठी साम,दाम लागतो , म्हणून आंदोलन यशस्वी करण्यासाठी पैशाची गरज भासु लागली . तेव्हा आंदोलकांनी विचार केला की आपल्याला पैशाची गरज आहे आणि निजामाला तर नामोहरण करायचे ,तेव्हा निजामाची सरकारी ब्यांक लुटली तर निजामाला अद्दल घडेल म्हणून 30 जानेवारी 1948 रोजी उमरी येथील ब्यांक आंदोलन कर्त्यांनी लुटुन जवळजवळ विस लाख सत्तर हजार रुपये लुटुन त्यातुन शस्ञास्ञ खरेदी करुन आंदोलन यशस्वी केले,या आंदोलनाला सर्व समाजातील व्यक्ती .विद्यार्थी सहभागी झाले होते.त्याच प्रमाणे 1938मध्ये औरंगाबाद च्या शासकीय महाविद्यालयात गोविंदभाई श्राफ यांच्या नेतृत्वाखाली 1200 ते 1300 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत म्हणण्याचा आग्रह धरला व झेंडा सत्याग्रह केला..हैद्राबाद किल्यावरचा असफजाही वंशाच्या धर्मांध सत्तेचे प्रतीक असणारा पिवळा ध्वज खाली उतरवून स्वतंत्र भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकू लागला..
सद्यस्थिती......
आज आपण मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो.पण खरोखरच मराठवाड्यातील जनता मुक्त झाली का? मराठवाड्याचा विकास झाला का? विकासाच्या बाबतीत ईतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा फारच मागे आहे.याला कारण राजकीय अनास्था आहे.
एकदा का आमदार ,खासदार निवडून आले की पुढच्या पाच वर्षीच तोंड दाखवतात, रस्ते ,पिण्याचे पाणी आणि शिक्षणक्षेञात आजही आपण मागे आहोत.मराठवाड्यातील ईतर जिल्ह्याच्या तीलनेत बीड जिल्हा फारच मागे आहे. उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंचन आणि शिक्षण कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही,पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पुरेशी शेती पीकत नाही त्यामुळे आत्महत्या चे प्रमाण आहे.जिल्ह्यात म्हणावे तसे उद्योग धंदे नाहीत.नांदेड जिल्ह्यात किनवट ,माहुर आजही आदिवासी भाग आहे आज पर्यत या भागाचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही,.एकविसाव्या शतकाकडे जात असताना प्रत्येकालाच आपण मागास आहोत असे वाटत आहे. आमदार ,खासदारांना तहहयात पेन्शन आहे, शिकल्या सवरल्या नविन गुरुजींना पेंन्शन नाही हीच शोकांतीका आहे.पाच सहा वर्षापासुन नोकरभरती नाही .मग वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी वाढणार नाही हे कशावरु ? गावागातील  धार्मिक तेच्या बाबतीत लाखो ची लोकवर्गणी जमा होते .गावच्या गाव पक्ती उठतात..पण शाळेच्या विकासासाठी कधी एकञ येताना दिसत नाहित (अपवादात्मक)निवडणूकीत पैसे वाटप केले जातात  पण विधायक कामासठी हात आकडता घेतात.?विकासाची दुरदृष्टी समोर ठेऊन अंतर्गत हेवेदावे बाजुला सारुन विकासासाठी राजकारणी एकञ आले तरच आपल्या मराठवाड्याचा विकास होईल. ग्राम पंचायत स्थरावर लाखो रुपये येतात तरीही..गावात पाणी ,रस्ते निट नाहीत..स्वातंत्र्याचा पंच्याहतरावा अमृत महोत्सव साजरा आपण सर्वांनी साजरा केला याचा आपणा सर्वांना अभिमान आहे..परंतु  पंच्याहत्तर वर्षातही गोर गरिबांना घरे ,रस्ते ,आरोग्य सुविधा मिळु नये..ही शोकांतीका नाही का.,रस्या अभावी नागपूर ,मुंबई सारख्या काही भागात बाळंतीन बाईचा मृत्यू  होतो...पाण्यासाठी लहान मुलांची शाळा बुडते...बस आभावी मुले मुली शाळेत जात नाहीत.आजही मुलींचा उपस्थिती भत्ता प्रतीदिन एक रुपया आहे...शाळेला दोन वर्षापासून अनुदान नाही..शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही,, जेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव..प्रत्येक जिल्हात वैद्यकीय महाविद्यालये ,तंञ महाविद्यालये .रस्ते जोडणी,ईंटरनेट जाळे .प्रत्येक शाळा दिल्ली सरकारच्या धर्तीवरची सर्व शाळांना अनुदान..शिक्षण सेवक ही संकल्पना रद्द करुन पुर्णतः शिक्षक दर्जा,.पेंन्शन योजना चालू.,ग्रामपातळी सर्व योजनांची माहिती आणि काटेकोर अंमलबजावणी ..राजकीय नेत्यांना उच्च शिक्षणाची अट.एकदाच निवडणूक लढवता यावी असे धोरण.अश्या योजनांनी प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी...राजकीय नेते सत्तेसाठी आपली पोळी भाजून घेतआहेत .. जर असेच आवो भाई बांधो भारा.आधा तुम्हारा आधा मेरा असे जर होत राहिले तर त्या स्वातंत्र्य सैनिकांना काय वाटत असेल.केवळ स्मृतीस्तंभावर जाऊन आदरांजली वाहिली की झाले असे न होता
त्यांच्या प्राणाची आहुती आठवण करुन विधायक कामे करण्याचा संकल्प करुया..,मुक्तीचा आक्रोश आमुचा स्वातंत्र्य आम्हा पाहिजे ...ध्यास एक श्वास एक एकता आम्हा पाहिजे.,अश्या ध्येयवेडे होऊन मराठवाडा मुक्तीलढ्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी व विरांगनांना विनंम्र अभिवादन
👏👏👏👏
.,प्रा.शेख युसूफ मौलासाब आंबुलगेकर (राज्य  निष्ठा  तज्ज्ञ )
9049786295 
 





-------

*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️💥🔫🇮🇳👨🏻🇮🇳🔫💥⚜️

                   *१७ सप्टेंबर*
       *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*

*आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –*

         मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हिंगोली
 
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी–*
   *'स्वप्ने पडली उष:काळाची*
        *हाती मात्र अंध:कार*
     *देश सारा उजळला जरी* 
   *मराठवाड्याची काजळ रात'*

           दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबादव संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला
 मराठवाडा पारतंत्र्यात होता. 
स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा
 प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल? हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.

*'रण  पेटले पेटले रण*
           *अग्निज्वाला सर्वदूर* 
*अंगार मनामनात* 
                *झुगारु हा अंकुश'*

जनमताचा प्रक्षोभ उसळला. खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.
    १९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात 
पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, 
किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या. आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली. निजाम सरकारविरुद्ध आपला रोष  व्यक्त केला.

*'मुक्तीचा आक्रोश आमुचा*
        *स्वातंत्र्य आम्हा पाहिजे* 
*ध्यास एक श्वास एक* 
        *हेच आमुचे ध्येय असे'*

भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार यासगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८  रोजी भारत सरकारने
 हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली. इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा
 इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. १७ सप्टेंबर १९४८ ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने 
त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात 
मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.
       आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती.
 17 सप्टेंबर 1948
 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....! 

*डॉ.आंबेडकर जी की भूमिका-*
 मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ 
निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार, दो पाटों के बीच पिसा
 जा रहा था. निजाम मीर उस्मान
अली खान ने डॉ. बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था. यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी. डाॕ.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है. रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा
 २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें. यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम 
रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुस-या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु 
झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, 
गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, 
बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची 
पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर
पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे 
काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,
 नांदेड येथील देवरावजी 
कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या
 कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम
 तेजस्वीपणे लढला गेला .
            या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल
 काढणं शक्य नाही.
              निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडूनआलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि
खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
 
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन  १७ सप्टेंबर रोजी तब्बल ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ७० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
       या संग्रामाच्या उज्ज्वल आणि 
लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या 
मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार
 होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण 
असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश
 स्वतंत्र झाला तरी हैदराबाद 
संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. 

निजामाचा धूर्त डाव होता की,
 १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून 
घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी
 संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद
 सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे 
हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. 
घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला.
 निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला *‘पोलीस ऍक्शन’* असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....!

*मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण*

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी 
संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये
 विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र 
भारतात सामील होण्याची सहमती 
दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त 
होऊन भारतीय संघराज्यात 
सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती
 संग्राम सुरु झाला होता. 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम रझवी 
याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
        मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल 
उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, 
मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या 
बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने
 मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, 
शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.
 या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 
1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. 
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली 
आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला.हैदराबाद संस्थानात 
तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा  लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
  
   *"समोर होता एकच तारा* 
       *अन पायतळी अंगार !"*

  *अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी, वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....!* 🙏🙏

       🇮🇳 *जयहींद*  🇮🇳
   
           ♾♾♾ *84* ♾♾♾
स्त्रोत ~ bmcschoos.blogspot.in                                                                                                                                                                                                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲


Comments

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती