प्राणी पक्षी व आवाज
💁♀️प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज.
1. कबुतराचे - घुमणे (गुटर्रघुमऽऽ)
2. कावळ्याची – कावकाव
3. कुत्र्याचे – भुंकणे,केकाटणे,गुरगुर
4. कोकीळचे – कुहुकुहू
5. कोल्ह्याची – कोल्हेकुई
6. कोंबड्याचे – आरवणे
7. गाईचे– हंबरणे
8. डास – गुणगुणणे
9. गाढवाचे – ओरडणे,रेकणे
10. डुक्कर – गुरगुर,घुरघुर
11. घुबडाचा - घूत्कार (घूं घूं करणे)
12. घोड्याचे – खिंकाळणे
13. तरस – हसणे
14. चिमणीची – चिवचिव
15. घुबड - घुत्कारणे, घुमणे
16. पक्ष्यांचा मंजुळ आवाज – किलबिल
17. पक्ष्यांचे भांडण – कलकलाट
18. बेडकाचे - डरावणे/डरकणे/डराँवड डराँवऽ
19. भुंग्यांचा – गुंजारव
20. घार - किलकिलणे
21. दयाळ – गाणे
22. मधमाश्यांचा – गुंजारव, गुंजन, गूंऽऽऽगूं करणे
23. माकडाचा - भुभुः कार
24. म्हशीचे - रेकणे
25. मोराचा – केकारव
26. माशी - घोंघावणे
27. पारवा – घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू
28. मोरांची – केकावली
29. बैल,रेडा - डुरकणे, डिरकणे
30. मांजरीचे - म्यँव म्यँव
31. वाघाची – डरकाळी, गुरगुरणे
32. रातकिडा – किरकिरणे
33. पाल – चुकचुकणे
34. सापाचे - फुसफुसणे (फूत्कार), फिसकारणे
35. हत्तीचे – चीत्कारणे
36. बुलबुल – गाणे
37. हंसाचा - कलरव
38. सिंहाची – गर्जना
39. बदक - पकपक, क्व्यॅक-क्व्यॅक
40. मैना – गाणे
41. शेळी,मेंढी – बें बें करणे
⭐महाराष्ट्र शिक्षक पॅनल⭐

No comments:
Post a Comment