आजचा शिकू आनंदे
वर्ग 1ली ते 5वि साठी लिंक
https://youtu.be/lEmuNlVJd48
वर्ग 6वि ते 8वि साठी लिंक
https://youtu.be/xSeaWVmJA-Q
शिकू आनंदे उपक्रमाविषयी माहिती
*महत्त्वाचे*
*प्रति,*
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)
विषय: " *शिकू आनंदे* "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती.खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात याबाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. ४ डिसेंबर २०२१ रोजीच्या सत्रात *कवायत,नृत्य,गीतगायन,लोकरकाम* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
https://youtu.be/lEmuNlVJd48
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
https://youtu.be/xSeaWVmJA-Q
याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.
-
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
★★★★★★★★★★★★■★■★
No comments:
Post a Comment