Sunday, 6 June 2021

शिवस्वराज दिन

 छत्रपती शिवाजी महाराज माहिती(निबंध व भाषण )यांसाठी उपयुक्त 
®®®®®®®®®®©©©©©©©










भाग 1

छत्रपती शिवाजीराजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

⛳विनंती: पुढे पाठवा
शिवगर्जना
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
भाग 2

शिव तुझे नाम ठेविले पवित्र | छत्रपती सूत्र विश्वाचे की ||
                🚩 जगतगुरु संत तुकोबाराय.🚩
  ⚜️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚜️
                👑🚩#शिवराज्यभिषेकदिन 🚩👑
#जगतगुरु_तुकाराम_महाराज , #स्वराज्य_संकल्पक_शहाजीराजे_भोसले, #राष्ट्रमाता_राजमाता_जिजाऊ_मॉसाहेब यांच्या शिकवणीतून #अठरापगड जातींच्या गोरगरीब,#शेतकरी_कष्टकरी_श्रमकरी, ऐत्तद्देशीय भुमीपुत्र आणि #आयाबहिणींच स्वराज्य स्थापन करणारे #कुळवाडीभुषण, #बहुजनप्रतिपालक, 🚩विश्ववंद्य #छत्रपती_शिवाजी_महाराज यांचा #शिवराज्याभिषेक #दिन_६_जुन - भारतीय #लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणारा दिवस ६ जुन - शेकडो वर्षांच्या राजकीय, धार्मिक व मानसिक #गुलामगिरीतून मुक्ती देणारा स्वातंत्र्यदिन
           #शिवराज्यभिषेक हा सोहळा केवळ एका राजाचा सोहळा नसून समस्त #शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब , #अठरा_पगड_जातीचा ,  सर्व धर्माचा , जनतेचा स्वतःचा असा हक्काचा सोहळा होता. प्रत्येकाला हे सिंहासन आपले वाटले. प्रत्येकाला आपण राजा आहोत हे वाटायला लावणारा अभूतपूर्व सोहळा होता....🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼
        "शतकाच्या यज्ञातुनी उठली एक केशरी ज्वाला l
          दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला ll 
          शिवप्रभुंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा l 
          दिशा दिशा भेदीत धावल्या खडकांच्या धारा ll 
          काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला l 
          दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला... "                                  🚩🚩  शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय l "
                 (6जुन 1674)   "रायडगडावर मऱ्हाठा  पातशहा येवढा #छत्रपती जाहला ही गोष्टी काही सामान्य झाली नाही"🥁🥁🥁🥁
         तमाम #भारतीयांना व सर्व पृथ्वीतलावरील शिव अनुयायांना कोटी कोटी शुभेच्छा व "छत्रपती शिवरायांना #विनम्र_अभिवादन......🌷🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
     बत्ती_द्या_तोफांना_आमचं_राजं_छत्रपति_झालं...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
                         #जय_शिवराय..!
                        #मरहट्टा_पातशहा
शिवश्री सिध्देश्वर कलावती भानुदास लांडगे शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेड प्रवक्ते लातूर🙏🙏🙏🙏
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
भाग 3

********************************

    *६ जून - शिव राज्याभिषेक दिन*

********************************

६ जून १६७४ 

१३१७च्या सुमारास दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. 

यासंपूर्ण भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  

स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी पार केले होते. केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या  सर्व शत्रुंना कुशल युद्धनीतीने नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली नि स्वराज्याचेही स्वप्न साकार केले.

स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडवरती प्राचीन ‘राज्याभिषेका’च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रुंनाही वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. 

स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो.

३४४ वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता ‌गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची.

राजास त्रिवार मानाचा मुजरा !

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

🙏🙏🙏

********************************
भाग 4

रायगडावर 6 जून1674रोजी अठरापगड जातीच्या आत्मसन्मानाचा सुवर्णसोहळा पार पडला,
 राजे बत्तीस मन सोन्याच्या  सिहासनावर विराजमान झाले. तेव्हा झोपडीतल्या गरीब मायला सुद्धा असं वाटत होतं की, जिजाऊ च लेकरू नाही तर माझं लेकरू राजा झालंय. आजच्याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने परिसर तर दुमदुमलाच पण तिकडे दिल्लीचे तख्त सुद्धा थरारलेलं होत.
आजच्या दिवशी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो आहे त्याबद्दल  सरकारचे अभिनंदन!
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने
जगाच्या इतिहासातील अद्वितीय राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला माझा त्रिवार मुजरा व आपणास खूप खूप शुभेच्छा 
💐💐🌳🌳🙏🙏
भाग 5

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*

    *शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक*
                   *६ जून १६७४*

        छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

         राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
👁️ *शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..*
 
हेन्री ऑक्सएन्डन (HENRY OXENDEN)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा *दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला.* या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.

🚩 ३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.

🚩 ३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.
 
🚩 १ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.

🚩 २ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.

🚩 ३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.

🚩 ४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.

🚩🤴🏻 ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.

हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.

*शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?*
                             हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.

त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”         
   
   🚩 *हर हर महादेव....!* 🚩                                                                                                                                                                                                                                
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

        ♾♾♾ *320* ♾♾♾
स्त्रोत~WikipediA,Laiibhaari.com
★★★★★★★★■■■■★★★★★★★
भाग 6
श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिल्यांदा लोककल्याणकारी राज्य निर्माण करुन रयतेचा राजा ही बिरुदावली मिरवली आणि सर्व पातशाही, दिल्लीचा मूघल औरंगजेब एवढेच नव्हे तर पोर्तुगीज, फिरंगी इंग्रज यांनाही एकाचवेळी लढा दिला.. हे करत असतानाच आप्तस्वकीयांची फंद फितूरीचा बिमोड केला. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात साडे तीनशे गड मिळवले वा उभारले... खरोखरच या राजाला इतिहासात तोड नाही... अशा अतूलनीय, महापराक्रमी, मूत्सद्दी, दूरदर्शी, लोककल्याणकारी राजाला मानाचा मुजरा...
राज्याभिषेक वर्धापनदिन सोहळा चिरायू होवो....
निश्र्चयाचा महामेरू
बहूत जनांशी आधारू
किर्तीवंत, मूर्तीमंत, गूणवंत, शीलवंत, बलवंत, यशवंत पूण्यवंत, औक्षवंत राजाधिराज श्रीमानयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏🙏


भाग 7
महाराष्ट्रातील किल्ले  पूर्ण  माहीत 
यासाठी पुढील लिंक ओपन करा

https://drive.google.com/file/d/1kHZNHEr5DcREX21QZPev6DD3TWwUk-NJ/view?usp=drivesdk

       जय जिजाऊ जय शिवराय

भाग 9

🚩 *शिवराज्याभिषेक*🚩
--------------------------------

सर्वांना ' *शिवराज्याभिषेक दिना*'च्या आणि ' *शिवस्वराज्य दिना*'च्या शुभेच्छा!

महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकानं, साडेतीनशे वर्षांपूर्वी देशात लोककल्याणकारी राज्याची, लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. अठरा पगड जातींना, बारा बलुतेदारांना, सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांताच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं राज्य स्थापन केलं. आदर्श राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. गडकिल्ले भक्कम केले. घोडदळ, पायदळ, आरमारानं सुसज्ज शिस्तबद्ध सैन्यव्यवस्था निर्माण केली. अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभारली. शेतीला, उद्योग, व्यापाराला प्रोत्साहन दिलं. पडीक जमीन लागवडीखाली आणली. शेतसारा, करांमध्ये सवलतीचं धोरण राबवलं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची ताकीद दिली. जे हवं ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे आदेश काढले. महिलांना सन्मान दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान दिला. कुठल्याही आव्हानाला भिडण्याचं बळ, विश्वास दिला. 

शिवराज्याभिषेकानं अखंड हिंदुस्थानला पहिले छत्रपती मिळाले. स्वकर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज जगातील सार्वकालीन सर्वश्रेष्ठ राजे ठरले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरच प्रगत, महाराष्ट्राची,हिंदुस्थानची आजवरची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाची, अभिमानाची घटना आहे. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊं माँसाहेब,स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना व स्वराज्य स्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करतो.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्

भाग 9

"शिवस्वराज्य अभिषेक सोहळा" हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक ऐतिहासिक आणि महत्वाचा प्रसंग होता. 

6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर या अभिषेकाचा भव्य सोहळा झाला होता. या सोहळ्यात शिवाजी महाराजांना "छत्रपती" हा मानाचा किताब देण्यात आला होता आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती.

राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी स्वतःला हिंदवी स्वराज्याचे प्रतिपादक म्हणून घोषित केले. यावेळी अनेक देशी-विदेशी पाहुणे, सरदार, अधिकारी आणि जनतेने उत्साहात सहभाग घेतला होता. राज्याभिषेक सोहळ्याचा मुख्य उद्देश महाराजांच्या स्वराज्याला एक वैधता आणि मान्यता मिळवून देणे हा होता.

हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि दरवर्षी 6 जूनला या प्रसंगाचे स्मरण करून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.









No comments:

Post a Comment

स्वामी विवेकानंद

 युवा दिन स्वामी विवेकानंद *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿        🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳                  ▬ ❚❂❚❂❚ ▬   ...