🚩🚩🚩🚩🚩 *स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन !! मानाचा त्रिवार मुजरा !!!* 🚩🚩🚩🚩🚩
★★★★★★★★★★★★★★★★
** *|| जिजाऊ वंदना ||* **
जिजा माऊली गे, तुला वंदना ही | तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही ||१||
भयातून मुक्ती, मिळाली जनांना |
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||२||
नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा | फुलांना, मुलांना, नसे दैन्य काही ||३||
जिजा माऊली गे.....
जशी पार्वती ती, प्रिया शंकरास |
तशी प्रेरिका गे, शहाजीस तूही ||४||
जसा संविभागी, बळी पुर्वकाळी |
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेही ||५||
जिजा माऊली गे.....
तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने | प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही ||६||
तुला वंदितांना, सुखी अंग अंग |
खरा धर्म आता, शिवाचाच पाही ||७||
खरा धर्म आता, शिवाचाच पाही.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
भाग 2
*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर, 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🏇🚩🚩🚩👸🏻🚩🚩🚩🤺
*राजमाता जिजाऊ*
*जिजाबाई शहाजीराजे भोसले*
*जन्म : १२ जानेवारी १५९८*
(सिंदखेडराजा,बुलढाणा, महाराष्ट्र)
*मृत्यू : १७ जून १६७४*
(पाचड, रायगडचा पायथा)
वडील : लखुजीराव जाधव
आई : म्हाळसाबाई उर्फ
गिरिजाबाई
पती : शहाजीराजे भोसले
संतती : छत्रपती शिवाजीराजे भोसले, संभाजी शहाजी भोसले
राजघराणे : भोसले
चलन : होन
जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
🔱 *भोसले व जाधवांचे वैर*
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
🌀 *अपत्ये*
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
⚜ *मुलाचे संगोपन व राजकारभार*
शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
🔮 *जीवन*
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
📚 *पुस्तके*
राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-
जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर
जेधे शकावली
शिवभारत
जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
जिजाई : मंदा खापरे
गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
अग्निरेखा
🎞 *चित्रपट*
जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी राजांवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-
राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)
स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)
*जय जिजाऊ...जय शिवराय*
🚩 *हर हर महादेव...*🚩
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
♾♾♾ *190* ♾♾♾
स्त्रोत ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲
भाग 3
*हे..राष्ट्रमाते..आई..जिजाऊ,*
*तुझे..स्मरण..नित्य..स्मरु..*
--------------
"जिजाऊ" शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा निर्झर आहे.या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे माॕ.जिजाऊ...
१२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली.राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.१६१० शहाजी सोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.
या वीर मातेच्या जीवनात आलेला एक एक प्रसंग व त्या प्रसंगाला धिरोदात्तपणे केलेला सामना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू आपल्याला उजागर करतो. माॕ.जिजाऊंनी त्यांच्या जीवनात जी संकटे प्रत्येक्ष अनुभवली ती जगातल्या एकाही मातेने अनुभवली नसावी.
©©©©©©©©©©©★★★★★★★★★★★
भाग 4
********************************
*१७ जून - राजमाता जिजाऊ स्मृतिदिन*
********************************
*जन्म -* १२ जानेवारी १५९८
(सिंदखेडराजा, बुलढाणा)
*स्मृती -* १७ जून १६७४
(पाचड, रायगडचा पायथा)
राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला, मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली.
जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजी राजांच्या आई-वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
राजमाता जिजाऊ ह्यांच्या थोर कार्यास कोटी कोटी प्रणाम !
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
*संदर्भ : विकिपीडिया*
********************************
भाग 5
*🔥आज राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांचा स्मृती दिन🔥*
*💫राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे होते. आई साहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत...*
*👉गडावरची हवा फार थंड.वाऱ्याचे वेग फार आई साहेबांची प्रकृति अतिशय नाजूक झालेली.गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या,पाचाड या गावी एक उत्तम वाडा बांधला.तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले.*
*👉लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले.आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या.*
*👉राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले.आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली.आई साहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?*
*आता कैचें येणें जाणे ?*
*आता खुंटले बोलणे !*
*हेचि तुमची अमुची भेटी,*
*येथूनिया जन्मतुटी !*
*पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहावर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत.*
*😔जीच्या प्रेमाचा ठाव लागत नाही.जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला.बुधवार होता या दिवशी. आई साहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली.आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.*
*😔दिवस मावळला. रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला ! चैतन्य निघून गेले ! आईसाहेब गेल्या ! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या.*
*😔महाराज दु:खात बुडाले. आई वेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल ! ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. 17 जून 1674 ) जिजाऊ माँ साहेब अनंतात विलीन झाल्या ...😔*
*🔥अशा या थोर मातेला त्यांच्या स्मृती दिनी कोटी-कोटी वंदन👏👏👏*
संकलन,
*प्रा.विजय रायमल, दे.राजा*
■■■■■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*विनम्र अभिवादन*
*हिच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती*
*हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिव शंभु छत्रपती !!*
राष्ट्रमाता,राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्य विनम्र अभिवादन!🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
********************************
*🚩 १२ जानेवारी 🚩*
*राजमाता जिजाऊ जयंती*
********************************
*जन्म* - १२ जानेवारी १५९८
(सिंदखेडराजा,बुलढाणा)
*स्मृती* - १७ जून १६७४
(पाचड,रायगडचा पायथा)
राजमाता जिजाऊ यांची आज जयंती !
विनम्र अभिवादन !
राजमाता जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला, मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली.
जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजी राजांच्या आई-वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
राजमाता जिजाऊ यांच्या थोर कार्यास कोटी कोटी प्रणाम !
🙏🙏🙏
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
🚩ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩
********************
१२ जानेवारी इ.स.१५९८
#राजमाता_जिजाऊ_जन्मोत्सव
१२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड
राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती
स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली.
आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.
या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे
सिंहासन रायगडी अवतरले.
स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚩 राजमाता नि राष्ट्रमाता 🚩*
*🙏 जिजाऊ साहेब 🙏*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब.
त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणावं लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते.
काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदरा खालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.
या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले.
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्या इतक्या तेजस्वी आणि सहयाद्री
सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
**राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन*
🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वराज्यरक्षक, आदर्श राजमाता
हिंदवी स्वराज्याची शान !
जिजाऊ माँ साहेब असे
नारीशक्ती चा स्वाभिमान !!१!!
भवानी मातीच्या कृपेने
पुत्ररत्न दिधला जिजाऊला!
स्वराज्य रक्षक राजे मिळाले
हिंदवी स्वराज्याच्या मातीला !!२!!
युद्धकला, समशेर, ढाल
शिक्षण देई शिवबाला !
राम, कृष्ण नि भिमाच्या
गोष्टी सांजवातीच्या वेळेला!!३!!
अन्याय, असत्य जुलम्यांना
नसे राज्यात थारा
गनिमी काव्याच्या ज्ञानानं
पारंगत हा मावळा सारा !!४!!
कौतुकाची थाप देवूनि
मौल्यवान खडे हेरती
स्वराज्य रक्षणासाठी
रक्ताचे सडे पडती !!५!!
धन्य ते शिवाजी राजे
धन्य ती जिजाऊ माऊली
स्वप्नपूर्ती होई मनाची
आनंदाश्रू वाहू लागली!!६!!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺✍️
श्रीमती कोरडे मंगल
गाऊ जिजाऊस आम्ही।।
सिंदखेडराजच्या भूमीवर
जन्मली सौदामिनी एक।
लखुजी जाधवांच्या पोटी
जिजाऊ लाडाची लेक।
तिजसाठी नवस केले
शस्र पाचवीला पुजले।
इतिहास घडविला तिने
शिवबा पोटी निपजले।
संस्काराचे पाजून डोस
गाजविला मराठी बाणा।
स्वराज्याची करून स्थापना
रयतेचा स्थापला राणा।
ओळखून जोडली माणसे
नाही पाहिले कधी जातधर्म।
राजमातेने रोविला झेंडा
मराठयांचे लखलखले कर्म।
गाऊ जिजाऊस आम्ही
हेच आमुचे अहोभाग्य ।
युगानुयुगे गाजेल किर्ती
जिने संपविले सारें वैराग्य।
सौ संगीता बोरसे
*संदर्भ : विकिपीडिया*
********************************

No comments:
Post a Comment