वसंतराव नाईक साहेब माहिती पट

 हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक साहेब  माहितीपट


माहित pdf स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक ओपन कारवी


https://drive.google.com/file/d/1WCLsclSu5MaHASVdQo7t61Nerok3GgP8/view?usp=drivesdk 


■■■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

भाषण व  निबंध लेखनासाठी माहिती


🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

   *वसंतराव नाईक साहेबांचे बालपण व शिक्षण*

लेखणः- गुरु तात्याराव चव्हाण औरंगाबाद.

********************************

        थोर माणसाच्या चरित्राचे अवलोकन केले म्हणजे आपणास दिसून येते की, काही थोर माणसे जन्मजात थोर असतात. तर काही थोर माणसे स्वतःच्या कर्तृत्वाने आणि अंगच्या गुणांनी थोर पदाला पात्र ठरतात. तर काही दैवयोगाने वर चढतात.

     आदरणीय नाईक साहेब हे यापैकी दुसऱ्या वर्गात मोडतात. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अंगी असलेल्या गुणांनी, कर्तृत्वाने तसेच खडतर तपश्चर्येने ते उच्च पदावर पोहोचले, हे त्यांचे चरित्र पाहिले की लक्षात येते.

      श्री.वसंतरावजी नाईक साहेब यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा समाजाच्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे गाव डोंगराच्या रांगा, झाडांची दाटीं आणि लहानशा ओढ्यानी वेढलेले आहे. हे निसर्गदृश्य अत्यंत रमणीय आहे. हे गाव पुसद शहरापासून साधारणतः १५ किमी अंतरावर आहे. नाईक साहेबांच्या वडिलांचे नाव फुलसिंग नाईक. स्वर्गीय फुलसिंग नाईकांना एकूण सहा अपत्ये. दोन मुले आणि चार मुली. त्यांच्या मोठ्या मुलांचे नाव राजुसिंग उर्फ बाबासाहेब,  तर लहाण्याने नाव हाजुसिंग उर्फ वसंतराव, वसंतराव लहाणपणी फारच गोंडस व चुणचुणीत दिसायचे.

         घर हेच विद्यापीठ, तेच धीनीति शिक्षणाचे खरे विश्वविद्यालय. या विद्यापीठाचा कुलगुरु असतो मुलांचा पिता व कुलपती असतेषत्यांची माता, विशिष्ट बालक आयुष्यात साधु-संत होणार की काळा-बाजारवाला होणार की पुढारी होणार हे भविष्य बालक आईच्या मांडीवर असतांनाच ठरत असते. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षापर्यंत चांगले संस्कार झाल्यास तो चांगला जबाबदार आदर्श नागरिक होऊ शकतो.

   नाईक साहेबांचे आई-वडिल अशिक्षित होते. तरी ते थोर विधायक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या वडिलांनी बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत असत. ते मागास समाजातील असुनही, आजच्या सुधारलेल्या सुधारकांपैक्षाही अधिक सुधारलेले होते.त्यांचा पिंडच मुळी समाज सुधारकांचा होता. आऋला समाज मागासलेला आहे. तो सुधारला पाहिजे, म्हणून त्यांनी विधायक कार्यावर लक्ष केंद्रीत केले. ते संस्कारशीलविचारवांत व धोरणी होते. ते व्यवहारी, कर्तव्यदक्ष व कष्टाळू होते. ते निर्वयसनी व ईश्वरभक्त होते. त्यांना शिक्षणाबद्दल आदर होता. वसंतरावजींच्या वडिलाप्रमाणेच त्यांच्या आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मधमिळावू होता.  त्या निश्चयी ळ न्यायप्रिय प्रिय होत्या. त्यांना गरीबांबद्दल कळवळा वाटायचा. वेळोवेळी त्या गरिबांना मदत करीत असे. माता-पित्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा नाईक साहेबांच्या मनावर खोल परीणाम झाले होते.

      वसंतरावजींच्या जन्मगावी शिक्षणाची व वाहतुकीची सोय नव्हती. त्यांच्या माताअ-पित्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून होते. आपली मुले फार फार शिकावीत, मोठे व्हावेत, असे त्यांना वाटायचे. राहत्या गावी शाळा नसल्यामुळे वसंतरावांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना आआपल्या खेडेगावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या खाजगी शाळेत घातले. शाळेत जातांना रोज ओढ्यातुन जावे लागे. दोन्ही भाऊ रोज ऊन्हा-तान्हात  तीन किमी पायी चालत जाऊध परत येत असत. त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक खेडेगावच्या शाळा बदलाव्या लागल्या. प्राथमिक शिक्षण घेत असतांना त्यांना अनेक प्रकारचे कष्ट व परीश्रम घ्यावे लागले. लहाणपणी ते बंजारा संस्कृतीनुसार कपडे घालत. म्स्थानिक मुलांकडून त्यांना चेष्टा व छळ सहन करावा लागला. त्यांची हुशारी व बुद्धिमत्ता पाहून 

*आपले पोरं पुढे चमकेल*

असे भविष्य त्यांच्या शिक्षकांनी सांगितले होते. त्यांना लहाणपणापासूनच शिकण्याची आवड होती. त्यांची हुशारी व बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या वडिलांना वाटे की, 

*आपल्या वसंताने फार फार शिकावे.*

वकीलीची परीक्षा पास व्हावे. समाजाची व देशाची सेवा करावी. अनेक प्रकारचे त्रास सहन करुन नाईक साहेबाआनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण त्यांनी यवातमाव जिल्ह्यातील पोहस, उमरी, बाॕन्सी, व भोजडा या गावी झाले. वडिलांच्या संस्काराशील मार्गदर्शनाखाली त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांना शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांना नेहमी खंत वाटे. 

ते म्हणत.

आम्ही सयाजीराव असल्यामुळे  आमचे नाव उजळले नाही. आमच्या वडिलांनी शिक्षण दिले नाही, 

म्हणून आम्ही आमच्या लेकरांना शिक्षण देण्याचे ठरवले आहे. 

   माध्यमिक शिक्षण यवतमाळ, अमरावती आणि नागपूर येथे पूर्ण केले. सन १९३३ ला नागपूर येथील नील सिटी हायस्कूल मधुन ते मॕट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. या शाळेत शिकत असतांना त्यांचा वाचनाचा व्यासंगही दांडगा होता. बहुजण समाजाबद्दल आत्मप्रत्यय व आत्मावलोकन बुद्धी जागृत करणारा पहिला समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार पटत गेले. शतकानुशतके अज्ञानाने, दारिद्रयाने व हीन संस्कृतीने ग्रासलेल्या या लोकांना आत्मपरीक्षण करण्याचा पहिला आदेश ज्योतीबांमुळे मिळाला. जातीभेदातील उच्चनिच्चतेचा कठोर अमल, धर्मसंस्थेच्या छत्राखाली अज्ञान व भोळेपणा यांनी भरलेल्या कल्पनांचे प्रस्थ, अंधश्रद्धेवर आधारीत चालीरीती इ. सामाजिक दोषांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

        त्या काळातील सामाजिक रचना आणि विशिष्ट वर्गाचे समाजातील प्रभुत्व यामुळे बहुजण समाजातील लोक, विशेषतः शेतकरी शिक्षण घेऊ शकत नसत. स्वतःवरील अन्यायाची त्यांना जाणीवही नव्हती. अज्ञान व दारिद्रय यामुळे आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जन त्यांना करुन घेता येत नसे. ज्योतिबांनी या लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्याच्या उद्धाराची प्रक्रीया  निर्भीडपणे सुरु केली. अस्पृश्यता निवारण आणि स्त्री-शिक्षण ही ज्योतिबांच्या सुधारणेच्या चळवळीची मुख्य अंगे होती. पुढे महात्मा गांधीजींनीही आफल्या स्वातंत्र चळवळीत याच गोष्टींना महत्त्व दिले. भामहात्मा फुले यांच्या शिकवणींचा नाईक साहेबांच्या मनावर फार प्रभाव पडला. 

     सन१९३० ते १९४० या स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात राजकीय व सामाजिक चळवळी चालल्या होत्या. मात्र महात्मा गांधीजी,पं. नेहरु, सुभाषबाबू इ. नेते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळी करीत होते. दलितोद्धारक, ज्ञानी, व्यासंगी आणि मूर्तीमंत मानवतावादी व्यक्ती डाॕ. बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या मानवी हक्कासाठी सत्याग्रह, मोर्चे लढवीत होते. महात्मा फुले व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजसेवेने प्रभावित होऊन आपणही बहुजण समाजासाठी सार्वजनिक व सामाजिक कार्य करावे, असे वसंतरावांनी त्यावेळी ठरवले होते. पं.नेहरुंच्या नेतृत्वाने मोहित झाले होते. त्यांचे नेतृत्व गुरुस्थानी मानुन त्यांनी देशसेवा करण्याचे ठरवले. त्याची पूर्तता त्यांनी केलेल्या सामाजिक , सार्वजनिक कार्यामुळे झाल्याचे दिसून येते.

    पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे ही महाराष्ट्रातील संस्कृतीची नगरी होय. या विद्येच्या मायभूमीत अनेक राज्यातुन विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात. पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे ते केंद्र आहे. तसेच विदर्भातील नागपूर शहर हे सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे केंद्र. त्या विभागात हे शहर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर. जुन्या मध्य प्रदेश राज्याची राजधानी. जिल्ह्यातील अनेक जातीजमातीचे विद्यार्थी येथे शिकायला येत. या महाविद्यालयात शिकून गेलेले अनेक विद्यार्थी मान्यवर पुढारी झाले. अशा नागपूर शहरी मॕट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नाईक साहेबांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी माॕरिस महाविद्यालयात (सध्याचे नागपूर महाविद्यालय)   प्रवेश घेतला. विद्यार्थी दशेत ते शांत पण धडाडीचे म्हणून त्यांचे नाव गाजले होते. पाणीदार डोळ्याचे आणि सुदृढ बांध्याचे नाईक साहेबांनी आपल्या तेजाने तळपत होते. विद्यार्थ्यांशी खेळीमेळीने वागणे, गोड बोलणे, कोणाचाही तिरस्कार न करणे, सगळ्यांना सांभाळून घेणे. असे त्यांचे वर्तन असे, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे त्यांना अनेक मित्र गोळा केले. ते सदैव मित्रांच्या घोळक्यात असत.  सन १९३७ ला ते नागपूर विद्यापीठातुन बी.ए.ची परीक्षा पास झाले. मराठी भाषा आणि साहित्य यावर त्यांचे प्रेम होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर याच महाविद्यालयात मराठी विषय घेऊन एमए. च्या वर्गात प्रवेश घेतला. काही दिवस अभ्यासही केला. नंतर ते अपूर्ण सोडून दिले, आणि पुढे त्यांनी वकीलीच्या अभ्यासाला सुरुवात केली.  विश्वविद्यालयात शिकत असतांना भरपूर अवांतर वाचन करणे, हा त्यांचा शिरस्ता होता. विद्यार्थी दशेत त्यांनी हारीभाऊ आपटे, नाथमधव यांच्या कादंबऱ्या आवडीने वाचाल्या.  सुप्रसिद्ध लेखक डेल कानेजी यांच्या विचारांचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर फार मोठा प्रभाव पडला.  या महाविद्यालयात शिकत असतांना विदर्भातील सुप्रसिद्ध कवी श्री.पांडुरंग गोरे यांची *शेतकऱ्याचे गाणे* ही कविता त्यांच्या वाचण्यात आली. ती त्यांना खूप आवडली. या कवितेबद्दल ते कवीला समक्ष भेटले. कवीचे त्यांनी अभिनंदन केले.  या कवितेता शेतकऱ्यांची पार्श्वभूमी कथण केली आहे,  मला तुमची कविता फार फार आवडली. 

         नाईक साहेबांना लहाणपणापासून शेतीबद्दल विलक्षण प्रेम.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात घेतला.  सन १९४० ला त्या विद्यापीठातुन ते वकीलीची परीक्षा पास झाले. जुन्या मध्य प्रदेशातील तर आजच्या महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील बंजारा समाजाचे ते पहिले वकील झाले. त्यावेळेपर्यंत समाज अत्यंत मागासलेला होता. अशिक्षित होता. वकीलाची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. पुसद येथे वकीली व्यवसायाला सुरुवात केली.

*अशा महान नेते, हरितक्रांतीचे प्रेणेतेः नाईक साहेबांना कोटी कोटी प्रणाम*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*लेखणः- गुरु तात्याराव चव्हाण, औरंगाबाद. (मो.नंबर- 9921562223)*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀


भाग 2


*महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल !*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^🌵🌿🌾🌴🌾🌴

✍ *याडीकार पंजाब चव्हाण,पुसद 📞9552302797*

==========================

 *1 जुलै 2021 हा भूमिपुत्र महानायक वसंतराव नाईक साहेबांचा 108 वा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो* परंतु सरकारने 2017 मध्ये हा दिवस नव्याने मतदार दिवस साजरा करावा असा आदेश काढल्यामुळे तमाम बंजारा समाजात खळबळ उडाली होती परंतु माननीय संजय भाऊ राठोड तत्कालीन राज्य मंत्री महसूल यांच्या अथक परिश्रमाने व आमच्या जागरूक व्हाट्सअप गँग यांनी वेळीच दखल घेऊन सदर मतदार दिवसाचा जीआर रद्द करण्यास शासनाला बाध्य केले त्यामुळें आमदार श्री संजय भाऊ राठोड व तमाम व्हाट्सअप गँग यांचे मनःपूर्वक आभार दुसरे आभार सरकारचे कारण बळीराजाला काही प्रमाणात कर्जमुक्त केले त्यामुळे सध्या बळीराजा आनंदात आहे संपूर्ण कर्जमाफी आंदोलन दरम्यान नाईक साहेब यांचीच आठवण येत होती कारण नाईक साहेबांचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्याचा असायचा *पहिला पाऊस मुंबईला पडला की नाईक साहेब पेढे वाटायचे आणि पावसाची स्वागत करायचे मी जरी मुंबईत असलो तरी माझे संपूर्ण मन शेतकऱ्याच्या बांधावर आहे असे ते आत्मविश्वासाने सांगायचे प्रत्येक शेतकऱ्याला आपला कुटुंबातला मुख्यमंत्री विराजमान आहे असे सतत वाटायचे म्हणून तीन तीन दिवस उपाशी राहणार शेतकरी कधी कधी मिलो ज्वारी वर गुजराण करणारा हा बळीराजा आत्महत्या करायचा नाही* परंतु का कुणास ठाऊक हा सतत विसा चा डब्बा घेतो किंवा विहीर जवळ करतो हे सर्व थांबवायचे असेल तर **महानायक नाईक*

*साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!* 

नाईकसाहेब आपण पुसद मध्ये वकिली करत असताना एकटेच संध्याकाळी दोन चार खेडे जसे भोजला ,पारडी, वालतुर येथे जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवित होते लोकांना कायद्याची जाणीव करून देत होते परंतु आज बहुजन समाजात प्रचंड प्रमाणात वकील ,डॉक्टर, प्राध्यापक आहेत परंतु आज तुमच्यासारखे कोणीही खेड्यात जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत नाही बंगला, माडी साडी आणि गाडीतच ही मंडळी जाम खुष आहे *त्यामुळे पे बॅक टू सोसायटी करण्यासाठी  महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!* 

पोफळी साखर कारखाना उद्घाटन प्रसंगी आपण शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अशी भीम गर्जना केली होती आपण हयात असताना पोफाळी कारखाना नफयात  तर बळीराजा सुखात होता परंतु आता तो कारखाना बंद होण्याच्या स्थितीकडे वाटचाल करत आहे तुम्ही निर्माण केलेली पुसद ची सूतगिरणी बंद पडलेली आहे त्यातील हजारो कामगार देशोधडीला लागलेले आहेत त्यामुळे कारखाना व सूत गिरणी सुरु ठेवण्याकरिता व शेतकरी हा कारखानदार करण्याकरिता *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 आपल्या धर्मपत्नी वत्सलाबाई नाईक यांनी एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे की मी नाईक साहेब यांना पूजा-अर्चा करताना कधी बघीतलेच नाही ते पूजा करायचे माणसाची आणि माणूस हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता परंतु नाईक साहेब तमाम बहुजन आज पूजाअर्चा होमहवन सत्यनारायण पूजा कर्मकांड व पूजा अर्चि,संकट चतुर्थी पौर्णिमा ,एकादशी,अमावस्या या व अशा धार्मिक कर्मकांड यामध्ये गुंतलेले आहे आपण तर कधी पूजा केली नाहीच परंतु *संत सेवालाल महाराजांनी सुद्धा भजो मत पुजो मत चा नारा दिला* आपला हा बहुजन बांधव पूजाअर्चा होमहवन कडे फार मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा खर्च करताना दिसतो आहे जेवढा मोठा अधिकारी तेवढा तो पोथीवाचक हरामाचे मिळालेले पैसे तो समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना देणार नाही परंतु शेगाव, शिर्डी ,शनिशिंगणापूर येथे जाऊन अमाप देणगी देणार पोहरादेवी येथे जाऊन नतमस्तक होण्यासाठी त्याला लाज वाटणार पण मुंबईत एका मंदिरात तासनतास ताटकळत दर्शन घेणार आपण कधीही पंचांग पाहिला नाही हे मी ठामपणे  या ठिकाणी नमूद करु इच्छितो परंतु हा बहुजन बांधव पंचाग, मंगळ जोतिष  पाहिल्याशिवाय लग्न करीत नाही तेवढी मोठी शोकांतिका दुसरे असे की चार पुस्तक शिकलेल्या आमच्या भगिनी शहरात आल्याबरोबर मार्गशीष महिना ,नवरात्र, संकट चतुर्थी ,वैभव लक्ष्मी व्रता कडे वळले आहेत आठवड्यातले चार चार दिवस उपास करून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे नाईक साहेब आपण पूर्ण हयाती मध्ये कोठेही मंदिराचे बांधकाम केले नाही परंतु तांडया  तांड्यात मंदिर काम बांधकामाचे फार मोठे लोन पसरले आहे या अनिष्ट रूढी परंपरा च्या मागे लागून समाज स्वतःची ओळख विसरत आहे हे सर्व थांबवायचे आम्ही अनेक प्रयास करत आहो नाईक साहेब परंतु आमचे कोणीही मनावर घेत नाही या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 नाईक साहेब आपण लग्नात हुंडा  घेतला नाही परंतु कमी खर्चात एक आदर्श लग्न केलं असे समाजात बुजुर्ग मंडळी आजही सांगतात परंतु नाईक साहेब आज लग्नाच्या बाजारात सर्वांचे रेट ठरलेले आहे पोलीस 300000 ग्रामसेवक पटवारी बाबू पाचलाख,प्राध्यापक इंजिनीयर 15 लाख ,डॉक्टर 30 लाख व त्यापुढे एवढेच नाही तर मग भैस चारणार सुद्धा साठ-सत्तर हजार घेतो इतर सोना चांदी आणि सामान वेगळे द्यावे लागते *देजो देणारा* हा समाज हुंड्यापायी आपल्या मुलाला चक्क बैलासारखा विकतो. आणि समाजातील एका घराला नेस्तनाबूत करण्याचा हा जुगार खेळतो यासाठी समाजात कोणीही पुढे यायला तयार नाही *हुंडा शिवाय लग्न करणारी मंडळी प्राध्यापक प्रभंजन चव्हाण पुणे ,भारत पवार मुंबई, डॉक्टर पवन राजूदास जाधव आर्णी व प्रवीण पंजाबराव चव्हाण पुसद अशी अनेक मंडळी समाजात आहे पण त्यांची प्रचार आणि प्रसिद्धी होत नाही* ज्यांच्या घरामध्ये डॉक्‍टर इंजिनिअर आहेत ते नाईक साहेब समाजाला फटकून वागतात मी आणि माझा सासरा बस बोटी आणि सळोई ? यामध्ये मजबुर आहेत यामुळे हुंडा न देऊ शकणाऱ्या कुटुंबातील आजही अनेक मुली नाईलाजास्तव मारवाडी समाजात विवाह करत आहे आणि गरीब घरातल्या मुली खानदेश  विभागात पैसा घेऊन विकल्या जात आहेत यासाठी अनेक मुली या लालची लोकांनी जाळून टाकले आहेत हे भीषण वास्तव्य थांबवायचे असेल तर *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 *नाईक साहेब आपण पुणे येथील शनिवार वाडया समोर भाषणात सांगितले होते की मी महाराष्ट्र दोन वर्षांत अन्न धान्याने स्वंय पुर्ण केला नाही तर मला फाशी द्या* शेती ही निसर्गाच्या पाण्यावर पिकत नसून स्वतःच्या घामाने पिकते उत्तम शेती करायची असेल तर माणसाने शेतीत गाडुन घेतले पाहिजे परंतु नाईक साहेब स्वतःच्या घामाने शेती पिकवण्याचे सोडून आज बहुजन बांधव ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या राजकारणात एवढा अखंड  बुडाला आहे की त्याला शेतात कोणती पिके घ्यायची याची सुद्धा जाणीव राहिलेली नाही काही शेतकरी तुमच्या शब्दाला जागून फार मोठी प्रगती करताना दिसत आहे परंतु टक्केवारीत  ते अल्प आहेत शासनाकडून काही मिळते का यासाठीच पंचायत समितीमध्ये दिवसेंदिवस चकरा मारणारे अनेक रिकामटेकडे मंडळी दिसून येते सकाळी उठून शेतात जाण्यापेक्षा त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे महत्त्वाचे वाटते तुम्ही निर्माण केलेले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, मृदसंधारण खाते हे शेतकऱ्यांच्या वरवर मलमपट्टी करतात परंतु कोणतेही चांगले उपक्रम राबविताना दिसत नाही बँका उद्योगधंद्यासाठी पतपुरवठा करीत नाही त्यामुळे बळीराजा हवालदिल व कर्जबाजारी झाला आहे शेताच्या बांधावर झाडे नाहीत गोठ्यात गुरे नाही ज्याला शेती विकून नोकरी लावली तो मुलगा परत कुटुंबाकडे लक्ष द्यायला तयार नाही अशा भीषण संकटात बळीराजा अडकला आहे बळीराजाला जगवायचे असेल तर *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावे लागेल!*

 नाईकसाहेब तुमच्या मुख्यमंत्री काळात महाराष्ट्रात बहुजनांच्या मुला-मुलीच्या सोयीसाठी 400 आश्रम शाळा निर्माण केल्या यामधून बहुजनाची शैक्षणिक फौज  निर्माण व्हायला पाहिजे होती असे आपले स्वप्न होते परंतु त्या आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष बहुजनातील फौज निर्माण करण्याचे सोडून स्वतः गब्बर होण्यात धन्यता मांनली तुम्ही सर्वांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळ द्धारे कॉलेज, वसतिगृह निर्माण करून विदर्भातील सर्व गोर गरीब मुलांना शिक्षणाची मोफत सोय करून दिली परंतु आज मुलाला पहिल्या वर्गात टाकायचे असेल तर दहा ते पंधरा हजार डोनेशन द्यावे लागते वरून ट्यूशन फी वेगळीच कसा शिक्षण घेणार समाज यांना धडा शिकवायचा असेल तर *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 31 जानेवारी 1953 साली माननीय लालबहादूर शास्त्री पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे दिग्रस येथे प्रथम अधिवेशन घेऊन तमाम गोर बंजारा बांधवांना एकत्र करून नवी दिशा देण्याचे फार मोठे क्रांतीकारी काम आपण केले होते आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून तमाम बंजारा बांधवांचे संघटन निर्माण करून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी क्रांतीकारी पाऊल उचललेले असताना नाईक साहेब आज समाजात बंजारा क्रांती दल राष्ट्रीय बंजारा क्रांती दल गोर्शिकवाडी, गोर सेना, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था, बंजारा परिवर्तन अभियान ,भारतीय भटके युथ फंट,राष्ट्रीय बंजारा मिशन, बंजारा सेना या व अशा जवळपास 70 ते 75  संघटना निर्माण झाल्या असून कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही यामध्ये व्हाट्सअप गँग  वेगळीच धुमाकूळ घालत आहे त्यामुळे बंजारा बांधव संभमित  झालेला आहे माननीय रणजित नाईक ,माननीय राजू नाईक मुंबई यांनी तमाम संघटना 2003 मध्ये एकत्र करून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाचे काम करण्याचा प्रयत्न केला परंतु माननीय हरिभाऊ राठोड इतर मंडळींनी प्रचंड विरोध केल्यामुळे सर्व संघटना एकत्र येऊ शकले नाहीत वेदनाकारक एकनाथ पवार यांची तांडा चलो अभियान आणि प्रा.संदेश चव्हाण याची गोरसेना अत्यंत चांगल्या प्रकारे काम समाजात करताहेत सर्व संघटना एकत्र करण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*

नाईकसाहेब तुम्ही यज्ञ केल्याचे कुठेही लिहिलेले नाही तसेच बहुजन समाजात यज्ञ केल्याचे इतिहासात सुद्धा नसताना आज बंजारा समाज यज्ञ करताना दिसतो आहे त्यामुळे तमाम  बहुजनांना वाचवण्यासाठी व अशा प्रथा समाजातून घालवायचे असतील तर ते सामर्थ्य तुमच्या मध्ये आहे त्यामुळे *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 नाईकसाहेब आपण शेवटच्या क्षणी सुद्धा सिंगापूर येथील हॉटेलमध्ये *हातात झाड असताना अखेर प्राण सोडले म्हणूनच मधू मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक आपल्याला हिरवा माणूस म्हणून संबोधायचे किती मोठे झाडावरचे आपले प्रेम*  आज सरकार एक कोटी वृक्ष लागवडीचे त्यानंतर तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविताना दिसत आहे परंतु लोकांचा सहभाग हा नगण्य असतो झाडावर प्रेम करण्या ऐवजी सर्व झाडांची कत्तल होताना दिसत आहे त्यामुळे जंगले नष्ट होत आहे झाडावर प्रेम करण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*

 पुसदच्या यशवंत मंदिरात आपली सभा एकण्यासाठी त्यावेळी खेड्यापाड्यातून लोक घरच्या भाकरी घेऊन सभेसाठी  पाच सहा कोस दरकोस पायी चालत यायचे व सभा संपल्यानंतर आपल्या भाषणामुळे आलेले हत्तीचे बळ घेऊन जलाराम हॉटेलमध्ये रस्याच्या आलुबोंडा यावर ताव मारून रात्री पायी गावाकडे जायचे आज तसे राहिलेले नाही एखाद्या नेत्याची सभा घ्यायची असेल तर मजुरीने माणसं  गोळा करावी लागतात पैसे देऊनही सभेला गर्दी जमत नाही लोकांना आता भाषण नको राशन  पाहिजे ही अफाट गर्दी जमवण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 तुम्ही मुख्यमंत्री असताना पुसद येथे सुरेश मेश्राम नावाचे S.D.O.होते त्यांच्याबाबत काही लोकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या त्याबाबत आपण जुने बंगल्यावर बोलावून मेश्राम साहेबांना नियमाप्रमाणे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले व त्यांना काम करण्याची संधी दिली आता तसे राहिलेले नाही राजकीय द्वेषापोटी अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात येते त्यांची बाजू ऐकून घेण्यात येत नाही या दुष्टचक्रातून अधिकारी वर्ग यांना वाचवण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 नाईकसाहेब तुमच्या काळात एका नायकावर नसाबं-हसाबं  करणारा तांडा आज राजकीय परिस्थितीमुळे चार चार  नायकाच्या दहशतीखाली वावरत आहेत तांड्यात आता शाळकरी मंडळी कमी आणि माळकरी जास्त झाले आहे ज्या तांडड्यात जसे समनक,ओरी, बकरी ,गेर करायचे त्याच तांड्यात भागवत कथा हरिपाठ सुरू आहे तांड्यातील शाळा अंगणवाड्यांच्या फरशी बसवणे करिता देणगी न देणारा बंजारा बांधव आज गणेश उत्सव, दुर्गा उत्सव मध्ये दीड लाखाच्या डिजेवर थिरकतो आहे त्याचे मूलभूत प्रश्न मागे पडलेले असून अध्यात्मिक प्रश्न समोर आलेले आहेत नवतरुण युवा पिढी खर्रा ,गुटखा बिअरच्या आहारी गेली आहे शेतात काम करताना कोणी दिसत नाही आणि खेळण्याकरिता पारावर गर्दी झालेली आहे बहुतांश मंडळी व्यसनापायी बरबादीचा मार्गावर आहे तांड्याला आता कोणी वाली राहिलेला नाही आम्ही पोरके झालो आहोत हे सर्व विदारक चित्र थांबण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*


 सन 1953 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईच्या घरी माननीय पद्मश्री रामसिंगजी  भानावत  यांना पाठवून आपण परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल ठेवले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  भावनेच्या भरात तुम्ही माझ्यासोबत येऊ नका प्रथम बंजारा समाजात एकमत करा असा संदेश दिला होता त्या दृष्टीने आपण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करून दिग्रस येथे 31 जानेवारी 1953 मध्ये प्रथम अधिवेशन बोलावले होते व 30 जानेवारी 1953 रोजी हा विषय कोर कमिटीत ठेवला परंतु उत्तर प्रदेशचे प्राध्यापक प्रीतमसिंह यांनी या परिवर्तनाच्या विषयावर प्रचंड विरोध केला त्यामुळे आपण परिवर्तनाच्या दिशेने गेलो नाही परंतु माननीय पद्मश्री रामसिंग भानावतजी , माननीय बाबू सिंग राठोड, माननीय बळीराम पाटील मांडवीकर, माननीय सखाराम मुडे गुरुजी उमरखेड, माननीय आमदार प्रतापसिंग आडे वसंतनगर या व अशा अनेक कार्यकर्त्याकडून आपण बंजारा समाजात परिवर्तन घडवून आणले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून ताठमानेने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आजही सामान्य माणसांना सुद्धा इतर मंडळी नाईकसाहेब म्हणूनच संबोधल्या जाते परंतु आज समाजात काम करणारे कार्यकर्ते फार कमी असून व्हाट्सअप वर रात्रंदिवस पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुकाळ झाला आहे व्हाट्सअप गँग ही सामाजिक काम करण्यासाठी गावात जाऊन प्रबोधन करणार नाही किंवा स्वतःच्या परिवारातील माणसाला मदत करणार नाही परंतु व्हाट्सअप वर प्रचंड गोंधळ घालणार ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे तसेच तांडा तांड्यात छोट्या छोट्या कारणावरून प्रचंड हाणामारी, कोर्ट केसेस ,498 च्या केसेस करण्यात राजकीय मंडळी गुंतलेली आहे आजही लोक सांगतात की आपण वकील असताना लोकांना कोर्टात केसेस करू नका भांडण तंटे गावातच मिटवा असा संदेश वारंवार देत होता परंतु आज बंजारा समाजातील वकील मंडळी समाजाला समजावण्याचे काम करताना दिसत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे *आपण प्रथम निवडणुकीला उभे असताना दौऱ्यामध्ये आपले पाय दुधाने धुऊन गावाच्या सीमेवर कुमकुम टिळकांनी स्वागत व्हायचे त्यानंतर त्याला जमेल तेवढे पैसे निवडणूक याकरता दान द्यायचे बाई मंडळी आपल्या कानातील सोन्याचे डूल, चांदीचे कड,े नाकातील नथ व इतर दागिने स्वखुशीने निवडणुकीकरिता आपल्या पदरात घेऊन धन्य मानायचे आता तसे राहिलेले नाही* निवडणूक काळात   उमेदवारा ची गाडी गेली की प्रचंड दगडफेक करायची त्यानंतर पैसा व दारू घेऊन मतदान करायचे एकाच पक्षाखाली मतदान करणारा तांडा आज अनेक पक्षांत विभागला गेला आहे बाप काँग्रेसला तर बायको दोनशे रुपयाच्या गॅस साठी मोदीला आणि पोरगं शिवसेना शिवसेनेला मतदान करताना दिसतो ही लोकशाहीची थट्टा व परिस्थिती सुधारण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

ज्या विधानभवनात आपण साडे अकरा वर्ष आदर्श मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे व विदर्भवीर माननीय भाऊ जाबुंवतराव धोटे साहेबा सारखे विरोधी नेते असताना सुद्धा विधान भवनाचे महत्त्व व गरिमा आपण कमी होऊ दिली नाही सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांमध्ये आपला सुसंवाद होता एखादा आमदार आमदार निवासात आजारी पडला तर आपण स्वतः जातीने भेट देऊन त्याची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची आता तसे राहिलेले नाही एका दिवसात चार चार वेळा विधानसभा, विधानपरिषद तहकूब करावी लागते हे सर्व थांबविण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 खरंच नाईकसाहेब तुम्ही आलात तर हुजरेगिरी करणारे तुमच्या पुढे पुढे गर्दी करतील व आम्हास दूर ढकलून देतील  आम्हाला पश्चाताप होईल एवढा मोठा लेख लिहून काय फायदा यासाठी *नाईकसाहेब तुम्ही चुपचाप या शक्य असेल तर सुधाकरभाऊ नाईक साहेबांना सुद्धा घेऊन या*  या तुम्हाला वरील सर्व भयानक परिस्थिती दिसेल ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*

 *तुम्हाला परत यावेच लागेल!*

 *तुम्हाला परत यावेच लागेल!*

 आपल्या प्रतीक्षेत ..........आपला सेवक

जय..वसंत👏👏


🌴🌾🌿🌵🌷🍀⛳🌾🌴🌴🌾🌿

✍ *याडीकार पंजाब चव्हाण सुंदल निवास कदम लेआउट श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ मोबाईल 📞नंबर 94 21 77 43 72*

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚



भाग 4

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह  🖥️*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬

     संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,

                    चंद्रपूर, 9403183828

➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  

🏭🌴🐄🇮🇳👨🏻🇮🇳🌳🐄🏭 


   *वसंतराव फुलसिंग नाईक*

 (महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते)

      *जन्म :१ जुलै १९१३*

 (गहुली,पुसद, यवतमाळ,महाराष्ट्र)

      *मृत्यू : १८ ऑगस्ट १९७९*

               (सिंगापूर)

राष्ट्रीयत्व: भारतीय

राजकीय पक्ष : अखिल भारतीय काँग्रेस

पत्नी : वत्सला वसंतराव नाईक

व्यवसाय : राजकारणी

धर्म : हिंदू - बंजारा,लमाण

                                                                                                                 *मुख्यमंत्री कार्यकाळ*

५ डिसेंबर, इ.स. १९६३ – २० फेब्रुवारी, इ.स. १९७५

राज्यपाल : विजयालक्ष्मी पंडित, पी.व्ही. चेरियन, अली यावर जंग

मागील : मारोतराव कन्नमवार

पुढील : शंकरराव चव्हाण

      

वसंतराव नाईक  हे मराठी राजकारणी होते. डिसेंबर ५, इ.स. १९६३ ते फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.  महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती.


🔸 *नाईक कुटुंब*

                            नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले.


📚🖊️ *शिक्षण*

                 वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.


🔮 *कार्य*

                वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

🌱🌴 *हरितक्रांतीचे प्रणेते*

                           आज १ जुलै, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.


कृषी विद्यापीठामार्फत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केल्यामुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती होऊ शकली. त्यातूनच वसंतराव हरितक्रांतीचे प्रणेते ठरले.

वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे स्थापन केली. चार कृषी विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांनी दर्जेदार बियाणे निर्माण केले. या बियाणांमुळे कृषिक्षेत्रात नवी क्रांती झाली. धान्य उत्पादन वाढले. एकाच वेळी धवल व हरितक्रांती घडवून आणण्याचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांना जाते.

वसंतराव नाईक यांच्यात आधुनिक महाराष्ट्र कसा घडवायचा हा दृष्टिकोन होता. आज आणली जात असलेली अन्नसुरक्षा योजना वसंतराव नाईकांनी त्याकाळी मांडली होती.


नाईकांनी अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले आणि राज्यभर तुफानी दौरे करुन शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. संकरीत बियाणांचा वापर करायचे शेतकऱ्यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या गहुली व शेलू येथील शेतीत संकीरत बियाणांची मोठय़ा प्रमाणावर लागवड त्यांनी केली. त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाणांचा प्रचार तडकाफडकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाणांच्या लागवडीखाली होती, ती ५०,००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकांच्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणात यश येत होते. याच वेळी अमेरिकेने पीएल 480 करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला आणि ते पुण्याच्या शनिवार वाडय़ासमोर गरजले, ‘महाराष्ट्र जर येत्या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या.’ त्यांचे हे आवाहन स्वीकारुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली व महाराष्ट्र आणि पुढे देशसुध्दा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले.


जो देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी बनला होता तो स्वावलंबी झाला ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांनाच निर्माण झाली. हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युध्दाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले. बलाढय़ शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुध्दा त्या काळात जे शक्य झाले नाही ते भारताने करून दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्यावतीने व डॉ. बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मक्याच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात नाईकांचा मोठा वाटा होता.


१९७२ च्या दुष्काळाचा सामना करतांना नाईकांनी जे परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. या दुष्काळामधूनच क्रांतकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी आणि क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर नरेगा च्या नावाने सुरु केली आहे. यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरु करणाऱ्या ह्या महान नेत्यांचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतानाही एवढी मोठी कोटय़ावधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतानाही तत्कालीन विरोधीपक्ष नेते कृष्णराव धुळुप आणि इतर सर्व विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली.


नाईकांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या प्रयत्नातूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बाध बंधाऱ्यांची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, या सारख्या कृषी क्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात. नाईकांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. नाईकांनी शेती व शेतकर्यांवर जसे प्रेम केले तसेच पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला. 


🪔 *मृत्यू*

                  वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.


💠 *भूषविलेली पदे*

     पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद

इ.स. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार म्हणून निवड.

इ.स. १९५६ साली सहकारमंत्रिपदावर नियुक्ती.

मागील: मारोतराव कन्नमवार *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री*

डिसेंबर ५, इ.स. १९६३ – फेब्रुवारी २०, इ.स. १९७५    पुढील: शंकरराव चव्हाण

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

     ♾♾♾ *333* ♾♾♾

        स्त्रोत~ Wikipedia                                                                      

➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹

📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*

*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती