खरी कमाई

खरी कमाई(आनंद नगरी)






*खरी कमाई*
                

             "आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे"

     मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देत, हर्ष उल्हास ,गणितांचा , भाजीपाल्याचा बाजार, पालकांची उपस्थिती ,वस्तूंची खरेदी विक्री आणि काडीमोड यांनी गजबजलेला जि.प.प्रा शा.फुटाना शाळेचा  *आनंद नगरी व आठवडी बाजार* हा  उपक्रम
             आज दिनांक 05 मार्च 2020 रोजी शाळेतील मुलांच्या पुस्तकी ज्ञानातभर पाडत व्यवहारिक कौशल्यांची जाणीव करून देण्यासाठी करण्यासाठी आनंदनगरी  हा उपक्रम घेण्यात आला
           या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय हिरीरीने  सर्वच मुलांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वत बनवलेले दुकाने थाटली.

▪ खायचे साहित्य- 
         पाणीपुरी ,आप्पे ,करंजी ,बर्फी चॉकलेट, समोसे ,पेढा ,जलेबी वाटाणे ,फुटाणे, शेंगदाणे, पोहे भजी, गोळ्या ,बिस्किट असे विविध खाण्याचे खाण्यायोग्य साहित्य
▪ भाजीपाला :-        
     भाजीपाल्यामध्ये पालक  वांगी, कलिंगड, मेथी, हरभरा, टमाटे ,अल्लू ,लसुन ,कोथिंबीर इत्यादी.

▪  कटलरी :- यामध्ये बिंदी ,टिकल्या ,असे साहित्य या नगरीत उभारण्यात आले होते.

      🏷 विशेष:-

        ● या  आनंद नगरी चे उद्घाटन smc अध्यक्ष  श्री शिवाजी राव कदम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
        ●   याआनंदनगरीसाठी विदयार्थी गेल्या तीन दिवसांपासून तयारी करत होते. पालकांनी  उपस्थित राहून खूप काही वस्तू खरेदी केल्या.
●   एकूण दुकानाची संख्या 45होती या उपक्रमातुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यांत अली या मध्ये विविध सामाजिक संदेश देणारे  बॅनर लावण्यात आले होते.
● दुकानांमध्ये प्रोत्साहनपर प्रथम  ,व्दितीय ,तृतीय क्रमांक निवडण्यात आले.
●आनंद नगरीस सर्वच मुलांनी आपल्या पालकांना सोबत आणून वस्तू घेण्याचा आग्रह केला. शिक्षणप्रेमी युवक ,समाजप्रेमी ,पालकांची उपस्थिती प्रेक्षणीय होती.
शेवटी मुले म्हणू लागली माझे 50 रु 100 रु झाले मला 50 ,60, 90 रु नफा झाला.

         हि आनंद नगरी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यध्याक श्री विलास परगणे सर श्री केशव मार्गाये सर श्री सयाजी केदारे सर श्री बळवंत राठोड सर श्रीमती सुनीता जाधव मॅडम ,यांनी सर्वतोपरी प्रयन्त केले.

🏘 जि प  प्रा शा फुटाना
     ता.कळमनुरी जि. हिंगोली
 

Comments

Popular posts from this blog

शाळा पूर्व तयारी अभियान

21जून जागतिक योगा दिन माहिती

APJ अब्दुल कलाम माहिती